नवी दिल्ली : सध्या १५ दिवस असलेला विमा पॉलिसीचा फ्री-लूक पिरियड वाढवून ३० दिवस करण्याचा प्रस्ताव भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणाने (इर्डाई) दिला आहे. अनेकदा पॉलिसी खरेदी केल्यानंतर ग्राहकास असे वाटले की, ही पॉलिसी आपल्यासाठी योग्य नाही. अशी पॉलिसी रद्द करण्याच्या मुदतीस फ्री-लॉक पिरियड म्हटले जाते.
पॉलिसीचा फेरविचार करण्यासाठी सध्या असलेला १५ दिवसांचा अवधी खूपच कमी आहे, असे जाणकारांचे मत आहे. हा कालावधी वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यामुळे तो ३० दिवस करण्याचा प्रस्ताव इर्डाईने दिला आहे.
हा पीरियड कशासाठी? nपॉलिसी घेण्याआधी ग्राहकाने दस्तावेज वाचलेला नसतो. नंतर ग्राहकांना वाटते की, खरेदी केलेली पॉलिसी गरजा पूर्ण करणारी नाही.nअनेकदा एजंट ग्राहकांना दिशाभूल करणारी माहिती देतात. ग्राहकांच्या मनात फसवणूक झाल्याची भावना निर्माण होते. त्यासाठी फ्री-लूक पिरियडची योजना केल जाते.