Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB चे ग्राहक असाल तर त्वरित करा हे काम, अन्यथा खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

PNB चे ग्राहक असाल तर त्वरित करा हे काम, अन्यथा खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

बँकेनं यासंदर्भात आपल्या ग्राहकांना ईमेल आणि मेसेज करून माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 07:30 PM2022-12-03T19:30:56+5:302022-12-03T19:31:23+5:30

बँकेनं यासंदर्भात आपल्या ग्राहकांना ईमेल आणि मेसेज करून माहिती दिली आहे.

If you are a PNB customer do this immediately otherwise the account will not be able to be withdrawn kyc update | PNB चे ग्राहक असाल तर त्वरित करा हे काम, अन्यथा खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

PNB चे ग्राहक असाल तर त्वरित करा हे काम, अन्यथा खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) सातत्याने आपल्या ग्राहकांना केवायसी (Know Your Customer) अपडेट करण्यास सांगत आहे. 12 डिसेंबर 2022 नंतर ज्या ग्राहकांचे KYC अपडेट केले जाणार नाही. त्यांना त्यांच्या खात्यातून पैशांचे व्यवहार करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना याबाबत सातत्याने माहिती देत ​​आहे. PNB ने म्हटले आहे की रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ग्राहकांनी त्यांचे KYC 12 डिसेंबर 2022 पर्यंत अपडेट करणे अनिवार्य आहे.

पंजाब नॅशनल बँकेने गेल्या महिन्यात एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की ज्या ग्राहकांनी अद्याप त्यांचे केवायसी अपडेट केलेले नाही. त्याच्या घरी दोन नोटिस पाठवण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. बँकेने 20 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर या संदर्भात एक अधिसूचना देखील शेअर केली होती.

व्यवहार करताना समस्या?
पंजाब नॅशनल बँकेनेही KYC अपडेट करण्यासाठी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अधिसूचना शेअर केली होती. यामध्ये PNB ने लिहिले- 'जर तुमचे खाते 30.09.2022 पर्यंत KYC अपडेटसाठी ड्यू असेल, तर तुम्हाला याबद्दल आधीच माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला 12.12.2022 पूर्वी तुमचे KYC अपडेट करण्यासाठी मूळ शाखेशी संपर्क साधण्याची विनंती केली जात आहे. अपडेट न केल्यामुळे, तुमच्या खात्याच्या ऑपरेशनवर बंदी घातली जाऊ शकते.

केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्ताच्या पुरावा, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. आपण ई-मेल पाठवून देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासोबतच बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी अपडेट करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली जाऊ शकते.

Web Title: If you are a PNB customer do this immediately otherwise the account will not be able to be withdrawn kyc update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.