नवी दिल्ली : अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमाफी देण्यात आली. मात्र, ही सवलत रिबेटच्या माध्यमातून देण्यात येईल. अर्थसंकल्पातील प्रस्तावानुसार, कलम ८७ए अंतर्गत रिबेटचा फायदा वेतनासह अन्य स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही मिळेल. मात्र, जमिनीची विक्री, तसेच इतर स्त्रोतातून होणाऱ्या उत्पन्नावर कर लागू राहील.
असे अनेक करदाते आहेत, ज्यांचे उत्पन्न सॅलरीशिवाय असते. त्यामुळे उत्पन्नाचे अनेक पर्याय असलेल्यांसाठी नेमक्या कोणत्या उत्पन्नावर कर लागू होईल आणि किती टॅक्स लागेल, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
रिबेट फक्त या प्रकरणांमध्ये मिळेल
जर पूर्ण उत्पन्न पगार, पेन्शन, व्याज, भाडे किंवा व्यवसायातून येत असेल तर. एकूण उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी किंवा १२ लाख असेल, तर आणि करदात्याने जर नवीन कर व्यवस्था स्वीकारली असेल, तर रिबेट मिळेल. जुनी कर प्रणाली निवडल्यास रिबेटचा फायदा मिळणार नाही.
कर कसा लागेल?
भांडवली नफा : जमीन आणि घर, शेअर्सची खरेदी-विक्री आणि म्युच्युअल फंडाच्या इक्विटीमध्ये झालेल्या नफ्यावर कर लागेल.
लॉटरी आणि गेमिंग शो : उत्पन्नात लॉटरी, घोड्यांच्या शर्यतींवरील नफा किंवा गेमिंग शोमधील इतर कमाईचा समावेश असेल, तर त्यावर ३०% कर.
विशेष कर श्रेणीतील उत्पन्न : जर कोणताही व्यक्ती फ्रीलान्सर्स, व्यावसायिक उत्पन्न मिळवत असेल, तर त्यांना नवीन कर प्रणालीत सवलत मिळत नाही.