Lokmat Money > बिझनेस न्यूज > जर तुम्ही बँकेत FD करण्याचा विचार करत असाल, तर 'या' बँक देत आहेत चांगले रिटर्न्स; वाचा...

जर तुम्ही बँकेत FD करण्याचा विचार करत असाल, तर 'या' बँक देत आहेत चांगले रिटर्न्स; वाचा...

जर तुम्ही बँकेत FD करण्याचा प्लॅन बनवला असेल, तर तुम्ही नेमकं कोणत्या बँकांमध्ये FD करून चांगला परतावा मिळवू शकता. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 08:21 PM2022-10-24T20:21:17+5:302022-10-24T20:21:55+5:30

जर तुम्ही बँकेत FD करण्याचा प्लॅन बनवला असेल, तर तुम्ही नेमकं कोणत्या बँकांमध्ये FD करून चांगला परतावा मिळवू शकता. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील.

If you are thinking of doing an FD in a bank these banks are giving good returns | जर तुम्ही बँकेत FD करण्याचा विचार करत असाल, तर 'या' बँक देत आहेत चांगले रिटर्न्स; वाचा...

जर तुम्ही बँकेत FD करण्याचा विचार करत असाल, तर 'या' बँक देत आहेत चांगले रिटर्न्स; वाचा...

जर तुम्ही बँकेत FD करण्याचा प्लॅन बनवला असेल, तर तुम्ही नेमकं कोणत्या बँकांमध्ये FD करून चांगला परतावा मिळवू शकता. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील. अशा बँकांची माहिती जाणून घेऊयात. मुदत ठेवी हा गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. नुकतंच अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले ​​आहेत. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदारांचा कल एफडीकडे जाऊ शकतो. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ५ लाख रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ठेव विमा हमी देखील आहे. येथे तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँकेने १, २, ३, ५ आणि १० वर्षांसाठी ऑफर केलेल्या FD व्याजदरांबद्दल सांगितले जात आहे. या बँकांमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
SBI ने २२ ऑक्टोबरपासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ मुदत ठेवींसाठी ०.८% पर्यंत व्याजदर बदलले आहेत. SBI आता १ वर्षाच्या ठेवींवर ५.५% व्याज देत आहे. तसेच, २ वर्षांच्या कालावधीसाठी ६.१% आणि ३ वर्षांच्या कालावधीसाठी ६.२५% व्याजदर आहे. ५ आणि १० वर्षांच्या कालावधीसाठी SBI FD व्याज दर ६.१% आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५% व्याज देखील देते.

HDFC बँक
HDFC बँकेने ११ ऑक्टोबरपासून FD व्याजदरात वाढ केली आहे. २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी, HDFC बँक पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या ठेवींवर ५.७% व्याज देत आहे. याव्यतिरिक्त, बँक 3 वर्षांच्या ठेवींवर ५.८% आणि ५ वर्षांच्या ठेवींवर ६.१% व्याज देते. HDFC बँक १० वर्षांच्या FD साठी ६% व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ०.५% अतिरिक्त व्याज मिळत आहे.

ICICI बँक
ICICI बँकेने १८ ऑक्टोबरपासून FD व्याजदर सुधारित केले आहेत. २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी, ICICI बँक १ वर्षाच्या ठेवींवर ५% आणि २ वर्षांच्या FD वर ५.८% व्याज देत आहे. बँक ३ वर्षांच्या ठेवीवर ६% आणि ५ वर्षांच्या ठेवीवर ६.२% व्याज देते. ICICI बँक १० वर्षांच्या FD साठी ६.१% व्याज देत आहे. ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५% व्याज देखील देते.

Web Title: If you are thinking of doing an FD in a bank these banks are giving good returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.