Lokmat Money > बिझनेस न्यूज > जर 'या' खात्यात मोठ्या प्रमाणात जमा केल्या २ हजाराच्या नोटा तर तुम्हीही फसाल

जर 'या' खात्यात मोठ्या प्रमाणात जमा केल्या २ हजाराच्या नोटा तर तुम्हीही फसाल

एका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्यानुसार, आयकर विभागाकडून सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 02:52 PM2023-05-22T14:52:45+5:302023-05-22T14:53:11+5:30

एका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्यानुसार, आयकर विभागाकडून सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

If you deposit 2000 notes in bulk in Jan Dhan account then you will also trouble | जर 'या' खात्यात मोठ्या प्रमाणात जमा केल्या २ हजाराच्या नोटा तर तुम्हीही फसाल

जर 'या' खात्यात मोठ्या प्रमाणात जमा केल्या २ हजाराच्या नोटा तर तुम्हीही फसाल

नवी दिल्ली - तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाच्या नावाने जन-धन खाते उघडले असेल तर सतर्क राहा. जर या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात २ हजारांच्या नोटा जमा झाल्या तर आयकर खात्याच्या चौकशीच्या फेऱ्यात तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, २ हजारांच्या काळ्या नोटा ठेवणारे जनधन खातेधारकाचा वापर करून बँकेत नोटा बदलू शकतात त्यासाठी या खात्यांवरही आयकर विभागाची नजर असणार आहे. 

खात्यात संशयस्पद व्यवहार झाल्यास बँक रिपोर्ट करणार
एका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्यानुसार, आयकर विभागाकडून सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जनधन खात्यांवर विभागाची करडी नजर आहे. जर कुठल्याही जनधन खात्यात संशयास्पद व्यवहार झाले तर त्याचा रिपोर्ट आयकर विभागाकडे जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी सतर्क राहिले असून जन धान खातेधारकांचा २ हजारांची नोट बदलण्यासाठी वापर होण्याची शंका विभागाला आहे. 

प्रामाणिक लोकांना त्रास देणार नाही
विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, जर कुणाच्या घरी २ हजारांच्या काही नोटा असतील आणि त्या बँकेत जमा करत असतील तर त्यांची चौकशी होणार नाही. परंतु जर कुणी गरीब अथवा जनधन खातेधारक मोठ्या प्रमाणात बँकेत २ हजाराची नोट जमा करत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. या लोकांवर नजर ठेवण्यासाठी बँक, कर विभाग आणि तपास यंत्रणाचे अधिकारी अलर्टवर आहेत. 

मोहिमेतंर्गत जनधन खाते उघडले होते
सध्या देशात बहुतांश लोकांकडे जनधन खाते आहे. समाजातील सर्व लोकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी काही वर्षापूर्वी जनधन खाते उघडण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे देशातील अनेक गरीब कुटुंबातील प्रत्येकाकडे किमान १ जनधन खाते आहे. या खातेधारकांचा वापर स्वार्थासाठी करून काहीजण २ हजारांच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करतील अशी शंका अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे या खात्यांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. 

Web Title: If you deposit 2000 notes in bulk in Jan Dhan account then you will also trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.