Join us  

चेक न वठल्यास कारागृहात पाठवा

By admin | Published: December 26, 2016 1:15 AM

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चेक बाऊन्स होण्याच्या कायद्यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चेक बाऊन्स होण्याच्या कायद्यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या प्रकरणी कठोर कायदा अंमलात आणू शकते. चेक न वठल्यास तुरुंगात पाठवा, अशा कायद्याचीही मागणी करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या एका संघटनेद्वारे सरकारला अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. बजेट तयार होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या भेटी ही संघटना घेत असल्याचे वृत्त आहे. चेक बाऊन्स होण्याच्या घटनांमुळे अनेक व्यापारी ग्राहकांकडून चेक घेण्यास काचकुच करतात. त्यामुळे चेक बाऊन्सप्रकरणी कठोर कायदा तयार करण्यात यावा, अशी या व्यापाऱ्यांची मागणी आहे.चेक बाऊन्सप्रकरणी संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या आत तुरुंगात पाठवावे, अशी सूचना संघटनेने केल्याचे वृत्त आहे. संबंधिताला तुरुंगात पाठवण्याच्या शिक्षेसाठी सरकार तयार आहे की नाही हे नक्की नसले तरी या प्रकरणी कायदा कठोर करण्याबाबत सरकार विचार करू शकते.