Lokmat Money > बिझनेस न्यूज > Savings Account चा वापर करत नसाल तर लगेचच करा बंद नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Savings Account चा वापर करत नसाल तर लगेचच करा बंद नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Savings Account : तुमचं जर सेव्हिंग अकाऊंट (Saving Account) असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 05:16 PM2021-03-03T17:16:02+5:302021-03-03T17:24:51+5:30

Savings Account : तुमचं जर सेव्हिंग अकाऊंट (Saving Account) असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

if you do not use savings bank account stop it immediately | Savings Account चा वापर करत नसाल तर लगेचच करा बंद नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Savings Account चा वापर करत नसाल तर लगेचच करा बंद नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

नवी दिल्ली - एकापेक्षा अधिक बँकांमध्ये तुमचं जर सेव्हिंग अकाऊंट (Saving Account) असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही एखाद्या बँकेत खातं उघडले असेल आणि त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर ते खातं लगेचच बंद करणं गरजेचं आहे. अर्थिक सल्लागारांच्या मते, वापरात नसलेलं बँक खातं (Bank Account) बंद करणं हे केव्हाही फायदेशीर आहे. गरजेपेक्षा जास्त बँक खाती असल्यास ही बाब नुकसानदायी ठरते. आपण जेव्हा नोकरी बदलतो किंवा नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो अशावेळी अन्य गरजांमुळे सेव्हिंग अकाऊंटसची संख्या वाढते. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक सेव्हिंग अकाउंट्स असतील तर ते नुकसानदायी ठरु शकतं. याबाबत अधिक जाणून घेऊया...

मिनिमम बॅलन्स ठेवणं अपरिहार्य

तुमच्याकडे सेव्हिंग अकाऊंट असतील तर ते प्रत्येक अकाऊंट सुरू ठेवण्यासाठी त्यात मिनिमम बॅलन्स (Minimum Balance) ठेवणं गरजेचं असतं. महिन्याला सरासरी बॅलन्स न ठेवल्यास बँक आपल्या पॉलिसीनुसार तुमच्या खात्यातून पैसे कापून घेऊ शकते. सर्व बँकांच्या रेग्युलर सेव्हिंग अकाऊंटसाठी हा नियम लागू आहे. त्यामुळे तुमच्यासमोर फक्त 2 पर्याय राहतात. त्यापैकी एक म्हणजे महिन्याला सरासरी बॅलन्स शिल्लक राहण्यासाठी ठराविक रक्कम सेव्हिंग खात्यात जमा करावी किंवा दुसरा पर्याय म्हणजे बँकेला पैसे कापू द्यावेत.

डेबिट कार्डचे चार्जेस द्यावे लागतील

जर तुम्ही तुमचे अकाऊंट वापरत नसाल तरी देखील तुम्हाला डेबिट कार्डचे चार्ज (Debit Card Charges) द्यावे लागतील. बँक खाते उघडण्यासाठी वेगळे चार्जेस नसतात. मात्र बऱ्याच बँका त्यांच्या डेबिट कार्डवर काही ठराविक फी आकारतात. ही फी वर्षाला 100 ते 1000 रुपये असते.  याव्यतिरिक्त काही बँका तुम्हाला फोनवर मेसेज करण्याचेही चार्जेस वसूल करतात. हा चार्ज तीन महिन्याला 30 रुपये असू शकतो.

दंड भरावा लागू शकतो

जर तुम्ही सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स ठेवू शकत नसाल तर तुम्हाला बँकेच्या नियमांनुसार दंड (Fine) भरावा लागतो. हा दंड वाचवण्यासाठी तुम्हाला खात्यात किमान बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. या किमान बॅलन्सची मर्यादा ग्रामीण, निमशहरी, शहरी आणि मेट्रोसिटीमध्ये वेगवेगळी आहे. जर तुम्ही दंड भरला नाहीत तर दंडाची रक्कम कालांतराने वाढत जाते. जर सतत 12 महिने बँक अकाऊंटमध्ये कोणतंही ट्रान्झेक्शन झालं नाही तर ते अकाऊंट इनएक्टिव्ह मानलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: if you do not use savings bank account stop it immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.