Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF खातं गोठवायचं नसेल तर डेडलाईनपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; पाहा डिटेल्स

PPF खातं गोठवायचं नसेल तर डेडलाईनपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; पाहा डिटेल्स

लहान गुंतवणूक योजनांमध्ये पीपीएफ ही सर्वात लोकप्रिय योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 04:48 PM2023-06-22T16:48:20+5:302023-06-22T16:48:49+5:30

लहान गुंतवणूक योजनांमध्ये पीपीएफ ही सर्वात लोकप्रिय योजना आहे.

If you dont want to freeze your PPF account do this important thing before the deadline aadhaar linking See details deadline | PPF खातं गोठवायचं नसेल तर डेडलाईनपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; पाहा डिटेल्स

PPF खातं गोठवायचं नसेल तर डेडलाईनपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; पाहा डिटेल्स

PPF Account Update: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खातेधारकांना त्यांच्या खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य आहे. लहान गुंतवणूक योजनांमध्ये ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. केंद्र सरकारनं आधार लिंकींगसाठी मुदतही दिली आहे. जर आधार कार्डपीपीएफ खात्याशी वेळेत लिंक केलं नाही, तर खातं फ्रीझसह इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

काय आहे पीपीएफ?
एक गुंतवणूकदार १५ वर्षांच्या गुंतवणुकीच्या मर्यादेसह पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत वर्षाला कमाल १.५ लाख रुपये जमा करू शकतो. यावर सरकार ७.१ टक्के दराने व्याज देते. अशाप्रकारे, १५ वर्षांसाठी दरवर्षी १.५ रुपये जमा केले जातात, ज्यावर वार्षिक व्याज १०,६५० रुपये मिळते. तथापि, सध्याचा ७.१ टक्के व्याजदर जुलै २०२३ पासून वाढण्याची अपेक्षा आहे.

आधार लिंक करण्याच्या सूचना
३१ मार्च २०२३  रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, अर्थ मंत्रालयाने PPF खातेधारकांना त्यांचे पीपीएफ खाते आधारशी लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुंतवणूकदारानं ३१ मार्च २०२३ पूर्वी खातं उघडलं असेल आणि त्याचा आधार क्रमांक कार्यालयात दिला नसेल, तर त्याला १ एप्रिल २०२३ पासून सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक द्यावा लागेल. म्हणजेच, पीपीएफ गुंतवणूकदारांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत त्यांचं खातं आधारशी लिंक करणं आवश्यक आहे. खातेदार आधारसोबत पॅन देखील सबमिट करू शकतात.

लिंक न केल्यास काय होणार?
अर्थ मंत्रालयानं आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलंय की, ज्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खातं उघडण्यात आलंय, त्या पोस्ट ऑफिसमध्ये निर्धारित वेळेत आधार क्रमांक सादर केला नाही आणि पीपीएफ खातं लिंक केलं नाही, तर खातं गोठवलं जाईल. यामुळे गुंतवणूकदारांना खालील समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

  • विहित व्याजाची रक्कम गुंतवणूकदाराच्या पीपीएफ खात्यात जमा केली जाणार नाही.
  • खातेदार त्याच्या PPF खात्यात पैसे जमा करू शकणार नाही.
  • पीपीएफची मॅच्युरिटी अमाऊंट गुंतवणूकदारानं दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार नाही.

Web Title: If you dont want to freeze your PPF account do this important thing before the deadline aadhaar linking See details deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.