मुंबई - आधुनिक स्मार्टफोन्स आणि आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे दैनंदिन जीवनात मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण कुठलाही मागचा पुढचा कुठला विचार न करता मोबाइलमध्ये कुठलेही अॅप डाऊनलोड केले जातात. मात्र या अॅपपैकी काही अॅप असे आहेत की जे तुमच्या मोबाइलमध्ये असल्यास तुमचे संपूर्ण बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते. पंजाब नॅशनल बँकेने यासंदर्भात आपल्या ग्राहकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पीएनबी का फंडा नावाने एक अभियान सुरू केले आहे. या अभियानंतर्गत बॅकेकडून ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले जात आहेत. त्याअंतर्गत बँकेने आपल्या ग्राहकांना काही अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामध्ये Quicksupport, Anydesk, VNC या अॅपचा समावेश आहे. याशिवास UltraVNC, TeamViver, Ammyy, Seescreen, BeAnywhere, LogMein, RealVNC, Skyfexetc ही अॅपसुद्धा धोकादायक असल्याचे पीएनबीने म्हटले आहे.
याबरोबरच ईमेल, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या लिंकबाबतही खबरदारी बाळगण्याचे आवाहन पीएनबीने केले आहे. या लिंकमधून थर्ड पार्टी किंवा अज्ञात स्रोतांवरील अॅप इन्स्टॉल करण्याचे आवाहन करण्यात येते. या माध्यमातून फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
आता कुठल्याही बँकेच्या एटीएममधून हव्या त्या बँकेत जमा करता येणार रोख रक्कम
खूशखबर! किसान क्रेडिट कार्डावर लवकरच मिळणार एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज!
SBIची योजना भारी, घर प्रकल्प पूर्ण होण्याची मिळणार हमी
तसेच ग्राहकांनी आपला पिन किंवा ओटीपी मोबाइल किंवा ईमेलच्या माध्यमातून कुणालाही देऊ नये, असे आवाहनही बँकेने केले आहे.