नवी दिल्ली - तुम्ही तुमचं पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केलं का? जर केलं नसेल तर त्वरित पँनकार्ड आधार कार्डशी त्वरित लिंक करून घ्या. कारण आता पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढण्याची शक्यता नाही आहे. तसेच पँन-आधार लिंक न केल्यास दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते. आता बँका पॅनकार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घेण्यासाठी मेसेज आणि मेल पाठवत आहेत. असे मेसेज वा मेल आला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तसे केल्यास आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागू शकतो.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने पॅन-आधार लिंक करण्यासाठीची अंतिम तारीख वाढवून ३० जून २०२१ ही निश्चित केली आहे. मात्र टँक्स विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही अखेरची मुदतवाढ आहे. आता जे लोक पँन आणि आधार लिंक करणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार करदात्यांना आधार-पॅन लिंक करण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली गेली आहे. मात्र अनेक करदात्यांनी अद्यापही पॅन-आधारकार्ड लिंक केलेले नाही.
आता जर तुम्ही ३० जून २०२१ पर्यंत पँनकार्ड आणि आधारकार्ड. लिंक केले नाही तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल. हल्लीच भारत सरकारने फायनान्स बिलच्या माध्यमातून इन्कम टँक्स अँक्टच्या १९६१ मध्ये बदल करून दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पॅन-आधार लिंक न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी सरकारने प्राप्तिकर कायद्यात नवे 234H हे कलम जोडले आहे.
तुमचे पॅन आणि आधारकार्ड लिंक आहे की नाही याची माहिती तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरून घेऊ शकता. दरम्यान, एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्ही पॅन आधार लिंक करू शकता. त्यासाठी तुम्हाला फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. त्यानंतर १२ अंकी आधार कार्ड क्रमांक टाइप करावा. त्यानंतर १० आकडी पॅन कार्ड क्रमांक टाईप करावा. आता स्टेप १मध्ये लिहिलेला मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवावा