नवी दिल्ली - जर आपल्याला नाणे जमवण्याचा छंद असेल, तर ही बातमी आपल्यासाठी आहे. अनेक वेळा लोक जुनी नाणी सांभाळून ठेवतात. आता हेच नाणे आपल्याला पैसे कमावण्याची संधी देत आहेत. खरे तर, या नाण्यांची किंमत आता बरीच वाढली आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका नाण्यासंदर्भात माहिती देणार आहोत. जे आपल्याला एका झटक्यात लकपती बनवू शकते...
जुन्या नण्यांच्या मोबदल्यात मीळतो चांगला पैसा -
जुनी नाणी विकून लोकांना लाखो आणि कोट्यवधी रुपयेही मिळतात. ऑनलाइन लिलावात या नाण्यांना चांगली किंमत मिळते. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुनी नाणी आणि नोटांसाठी बोली लावली जात आहे. यामाध्यमातून आपण कुठल्याही झंजटीशिवाय पैसे कमवू शकता. जर तुमच्याकडे असे 50 पैशांचे नाणे असेल तर त्या बदल्यात तुम्हाला 1 लाख रुपये मिळू शकतात. यासाठी आपल्याला केवळ त्या नाण्याचा ऑनलाइन लिलाव करावा लागेल.
महागाईमुळे लोकांनी 50 पैशांचे नाणे वापरणे बंद केले. परिणामी सरकारनेही 50 पैशांचे नाणे तयार करणे बंद केले आहे. यानंतर, हे नाणे हळू-हळू चलनातूनही बाहेर पडले. मात्र, आता हे नाणेच आपल्याला लखपती बनवू शकते.
1 लाख रुपयांत विकले जातेय हे नाणे -
OLX वर हे नाणे 1 लाख रुपयांना विकले जात आहे. हे नाणे वर्ष 2011 मध्ये तयार झालेले आहे. हे या नाण्याचे वैशिष्ट आहे. जर आपल्याकडे अशा प्रकारचे 50 पैशांचे नाणे असेल, तर आपण झटक्यात लखपती बनू शकता.
असे विकता येईल नाणे -
- आपल्याकडे 2011 मध्ये तयार झालेले हे 50 पैशांचे नाणे असेल, तर आपण ते OLX वर ऑनलाइन पद्धतीने विकू शकता.
- या नाण्यासाठी ग्राहक मोठी किंमतही मोजत आहेत.
- हे नाणे विकण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम Olx वर सेलर म्हणून रजिस्टर व्हावे लागेल.
- यानंतर नाण्याचा दोन्ही बाजूंचा फोटो काढून तो अपलोड करावा लागेल.
- यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकावा लागेल.
- यानंतर, ज्याना हे नाणे घ्यायचे आहे, ते आपल्याला कॉल करतील.