Join us

तुमचं पीएफ खातं असेल तर 'हे' काम नक्की करा; नाहीतर EPFOच्या सुविधा बंद होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 5:23 PM

पीएफ खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य झाले आहे. तुम्ही ही कामे केली नाही तर काही सुविधा बंद होऊ शकतात.

आपण बचतीसाठी अनेक मार्गांचा वापर करत असतो. कर्मचाऱ्यांच्या बचतीसाठी सरकारने प्रोव्हीडंट फंडाची सुविधा सुरू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात व्याजही मिळतं. पण, आता ईपीएफओ संदर्भात एक अपडेट समोर आली आहे. बँक खाते असो किंवा बचत योजना खाते असो, खातेधारकाने नॉमिनी घोषित करणे आवश्यक आणि फायदेशीर दोन्ही आहे. हीच गोष्ट ईपीएफ खात्यालाही लागू होते. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने सर्व EPF सदस्यांसाठी नामांकन अनिवार्य केले आहे.

सर्वात स्वस्त दारू गोव्यात, कर्नाटकात ८३ टक्के टॅक्स; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत काय स्थिती

जर तुम्ही नॉमीनी घोषीत केले नाहीतर ईपीएफओ खातेधारकाला अनेक सेवांपासून वंचित ठेवले जाणार आहे. या सुविधांमध्ये पीएफ खात्यातील बॅलन्स तपासणे देखील समाविष्ट आहे. नॉमिनी असल्याने, खातेदाराच्या मृत्यूनंतर, खातेदार ज्याला देऊ इच्छित आहे त्याला ते पैसे दिले जातात. एक खातेदार एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील होऊ शकतो.

तुम्ही ईपीएफओ खात्यात ऑनलाइन नामांकन करू शकता. पीएफ खातेधारक आणि त्याच्या कुटुंबीयांना पीएफ लाभ देण्यासाठी ई-नामांकन खूप उपयुक्त आहे. पीएफ सदस्याचा मृत्यू झाल्यास भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, विमा लाभांचा ऑनलाईन दावा आणि सेटलमेंट ई-नामांकन केल्यावरच शक्य आहे. जर कर्मचार्‍याने नॉमिनीचा उल्लेख केला नसेल आणि कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर, त्यांच्या वारसाला पीएफ सोडण्यासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल.

कोणाला नॉमिनी बनवू शकता?

पीएफ खातेधारक फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी नॉमिनी करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे कुटुंब नसेल, तर अशा परिस्थितीत तो इतर कोणत्याही व्यक्तीला आपला नॉमिनी म्हणून घोषित करू शकतो. इतर कोणाला नॉमिनी बनवल्यानंतर, कुटुंबाचा पत्ता माहीत असल्यास, नातेवाईक नसलेल्या व्यक्तीचे नामांकन रद्द केले जाते. एक EPF खातेधारक एकापेक्षा जास्त नॉमिनी करू शकतो. एकापेक्षा जास्त नॉमिनी असल्यास, अधिक तपशील द्यावा लागेल. कोणत्या नॉमिनीला किती रक्कम द्यायची हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल.

ई-नामांकन अनिवार्य

ईपीएफओने ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. जर एखाद्या सदस्याने ई-नामांकन केले नाही तर तो त्याचे पीएफ खाते शिल्लक आणि पासबुक पाहू शकत नाही. ई-नामांकनासाठी, खातेधारकाचा UAN सक्रिय असणे आवश्यक आहे आणि मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. ऑनलाइन खातेदार घरी बसूनही ई-नामांकन करू शकतात.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीव्यवसाय