Join us

तुमचे PNB मध्ये खाते असल्यास मोफत मिळेल 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या सविस्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 5:59 PM

PNB : बेसिक बचत खाते जन धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय सुद्धा आहे. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते.

नवी दिल्ली : पीएनबी (PNB) आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा देत आहे. बँक ही सुविधा जन धन खात्यांच्या  (Jan Dhan Accounts) खातेधारकांना बँक पुरवत आहे.  तसेच, ग्राहक बँकेच्या आणखी अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात. याबद्दल जाणून घेऊया...(If You Have This Account In PNB You Will Get 2 Lakhs Rupees Free Benefit) मोफत मिळेल 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभयाचबरोबर, पीएनबी रुपे जन धन कार्डची (PNB Rupay Jandhan Card) सुविधा जन धन ग्राहकांना बँकेकडून दिली जाते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे. रुपे कार्डच्या (Rupay Card) मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता. 

ट्रान्सफर करण्याचा सुद्धा पर्यायबेसिक बचत खाते जन धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय सुद्धा आहे. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या RuPay PMJDY कार्डसाठी विमा रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती कव्हर बेनिफिट उपलब्ध होईल.

जाणून घ्या क्लेम कसा करायचा?या योजनेंतर्गत वैयक्तिक अपघात धोरणात भारताबाहेरील घटनेचाही समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विमा रकमेनुसार दावा भारतीय रुपयांमध्ये भरला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसांच्या खात्यात नामनिर्देशित होऊ शकतो.

अशा प्रकारे उघडा खाते...जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहज करू शकता, यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा टाऊन कोड इत्यादी द्यावे लागतील.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबँक