Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्ही पत्नीच्या नावाने पैसे गुंतवले तर टॅक्स लागेल का?; जाणून घ्या काय सांगतो नियम

तुम्ही पत्नीच्या नावाने पैसे गुंतवले तर टॅक्स लागेल का?; जाणून घ्या काय सांगतो नियम

महिला दिनाच्या निमित्ताने पत्नीच्या नावाने गुंतवणूक करून तुम्ही त्यांना मोठी गिफ्ट देऊ शकता. मात्र अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागतो की नाही हे माहिती असणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:53 AM2022-03-05T11:53:03+5:302022-03-05T11:53:18+5:30

महिला दिनाच्या निमित्ताने पत्नीच्या नावाने गुंतवणूक करून तुम्ही त्यांना मोठी गिफ्ट देऊ शकता. मात्र अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागतो की नाही हे माहिती असणे आवश्यक आहे.

If you invest money in wifes name will there be taxable know what the rules say | तुम्ही पत्नीच्या नावाने पैसे गुंतवले तर टॅक्स लागेल का?; जाणून घ्या काय सांगतो नियम

तुम्ही पत्नीच्या नावाने पैसे गुंतवले तर टॅक्स लागेल का?; जाणून घ्या काय सांगतो नियम

महिला दिनाच्या निमित्ताने पत्नीच्या नावाने गुंतवणूककरून तुम्ही त्यांना मोठी गिफ्ट देऊ शकता. मात्र अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागतो की नाही हे माहिती असणे आवश्यक आहे. कर नियमानुसार पतीने जर पत्नीच्या नावावर बँकेत अथवा इतर कोणत्या ठिकाणी काही गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक भेट म्हणून मानली जाते.

तसेच नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंसाठीही काही प्रमाणात सूट आहे. नांगिया अँडरसन इंडियाचे संचालक चिराग नांगिया यांच्या मते, पत्नीने इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरताना गुंतवणुकीची रक्कम उघड करणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, पतीने पत्नीच्या नावाने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केली असल्यास, व्याजाचे उत्पन्न त्याच्या एकूण उत्पन्नात आयटीआरच्या एसपीआयमध्ये एकत्रित केले जाईल. मात्र नांगिया यांच्या म्हणण्यानुसार, पत्नीने इतके एकत्रित उत्पन्न जाहीर करणे आवश्यक नाही.

प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ५६ (२) नुसार एखाद्या व्यक्तीला मिळालेले एकूण पैसे एखाद्या आर्थिक वर्षात कोणताही विचार न करता ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास कर लागू होतो. अशा रकमेवर इतर स्त्रोतांकडून मिळकत म्हणून कर आकारला जातो.

नातेवाइकांनी दिलेल्या रोख भेटवस्तूंवर कर
प्राप्तिकर नियमांनुसार, नातेवाईकांकडून मिळालेल्या रोख भेटवस्तूंना पूर्णपणे सूट आहे. ज्या नातेवाइकांसाठी हा नियम लागू होतो संबंधित व्यक्तीचा पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण, भावाची किंवा बहिणीची पत्नी किंवा पती, व्यक्तीच्या आईवडिलांची बहीण किंवा भाऊ (आत्या, मावशी, मामा), कायद्यात नमूद केल्यानुसार व्यक्तीचे वारस यांच्याकडून व्यक्तीला मिळणाऱ्या भेटींना करातून सूट देण्यात आली आहे.

५०,००० रुपयांपेक्षा अधिकच्या भेटवस्तू नकोत

  • आरएसएम इंडियाचे संस्थापक डॉ. सुरेश सुराणा यांच्या मते, एका आर्थिक वर्षात एक किंवा अनेक व्यक्तींकडून मिळालेली एकूण रोख रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, लागू स्लॅब रेटनुसार अशा रकमेवर कर लागेल. 
  • त्यामुळे, कर टाळण्यासाठी, मिळालेल्या भेटवस्तूंची एकूण रक्कम एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. यानंतरही कर लागला तर तो संबंधित व्यक्तीने भरावा.

Web Title: If you invest money in wifes name will there be taxable know what the rules say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.