नवी दिल्ली : लसीकरणाबाबत (Vaccination) लोकांना जागरूक करण्यासाठी कंपन्या अनेक आकर्षक ऑफर्स (Offer) देत आहेत. अनेक कंपन्यांनी लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी एकाहून एक अशा चांगल्या आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. आता अशा ऑफर देणाऱ्या कंपन्यांमध्ये ॲमेझॉन (Amazon) या बड्या ई- कॉमर्स (E- Commerce) कंपनीचाही समावेश झाला आहे. (if you vaccinated then earn 3 crore rupees check amazon vaccination offer)
ॲमेझॉन कंपनी आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सना (Front line Workers) 500,000 डॉलरच्या (सुमारे 3.70 कोटी रुपये) रोख बक्षिसांसह, कार आणि सुट्ट्यांचे पॅकेज देणार आहे. मात्र, यासाठी त्यांना कोरोनाची लस घेतल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.
जाणून घ्या, कोण या स्पर्धेत घेऊ शकते?ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ॲमेझॉन लसीकरण स्पर्धेअंतर्गत एकूण 18 बक्षिसे देणार आहे. या बक्षिसांचे एकूण मूल्य जवळपास 2 मिलियन डॉलर्स आहे. यामध्ये 5 लाख डॉलर्सची (अंदाजे 3.70 कोटी रुपये) दोन रोख बक्षिसे, 1 लाख डॉलर्सची (अंदाजे 70 लाख रुपये) सहा बक्षिसे, पाच नवीन वाहने आणि पाच व्हेकेशन पॅकेजेसचा (Vacation Package) समावेश आहे.
ॲमेझॉनची ही स्पर्धा त्या कंपनीत काम करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्ससाठी आहे. ॲमेझॉनच्या फ्रंटलाइन वर्कर्समध्ये गोदामे आणि इतर वाहतूक (Logistics) सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. हे सर्व कर्मचारी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच होल फूड्स मार्केट, ॲमेझॉन फ्रेश किराणा स्टोअर्स आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरमध्ये प्रति तासावर काम करणाऱ्या कामगारांचाही त्यात समावेश आहे.
मास्क घालणे आता अनिवार्य अॅमेझॉनने अमेरिकेतील गोदामातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर मास्क घालण्यास सांगितले आहे. कारण, देशातील डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. लसीकरणाच्या स्थिती कोणतीही असो मास्क घालणे आता अनिवार्य आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
अॅमेझॉनने नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेत कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटचा होणारा प्रसार पाहता, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार, लसीकरण झालेलं असो वा नसो, आपल्याला घरामध्येसुद्धा मास्क घालणं आवश्यक आहे.