Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोट्यधीश बनायचं असेल तर दररोज वाचवा १०० रुपये, जाणून घ्या गुंतवणूकीचा हा फॉर्म्युला

कोट्यधीश बनायचं असेल तर दररोज वाचवा १०० रुपये, जाणून घ्या गुंतवणूकीचा हा फॉर्म्युला

आपण कोट्यधीश व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 10:39 AM2023-10-01T10:39:53+5:302023-10-01T10:44:28+5:30

आपण कोट्यधीश व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक असतं.

If you want to become a millionaire save 100 rupees every day know this investment formula mutual funds sip investment tips | कोट्यधीश बनायचं असेल तर दररोज वाचवा १०० रुपये, जाणून घ्या गुंतवणूकीचा हा फॉर्म्युला

कोट्यधीश बनायचं असेल तर दररोज वाचवा १०० रुपये, जाणून घ्या गुंतवणूकीचा हा फॉर्म्युला

आपण कोट्यधीश व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. कोट्यधीश बनण्यासाठी (How to become Rich) आपल्याला खूप पैसे कमवावे लागतील असंही अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही. तुमचं उत्पन्न कमी असलं तरी तुम्ही सहजपणे कोट्यधीश होऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, पैसे कमवण्यापेक्षा त्याची बचत करणं अधिक महत्त्वाचं आहे. जे लोक पैसे वाचवण्यात निष्णात असतात ते चांगला बँक बॅलन्सही तयार करू शकतात.

परंतु केवळ पैसे वाचवून कोणी श्रीमंत किंवा कोट्यधीश होऊ शकत नाही. ही बचत योग्य ठिकाणी गुंतवणेही खूप महत्त्वाचं आहे. केवळ गुंतवणुकीची योग्य समज तुम्हाला लवकर कोट्यधीश बनवू शकते. आज आम्ही तुम्हाला कोट्यधीश बनण्याचा असाच एक फॉर्म्युला सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला रोज फक्त १०० रुपये वाचवावे लागतील. दररोज शंभर रुपये वाचवून तुम्ही सहज कोट्यधीश होऊ शकता. 

कसा होईल फायदा
प्रयत्न केल्यास दररोज शंभर रुपये सहज वाचू शकतात. अशा प्रकारे तुमची एका महिन्यात तीन हजार रुपयांची बचत होईल. आता हे पैसे तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवावे लागतील. तुम्हाला अंदाजे २० टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास, २१ वर्षांत म्हणजे २५२ महिन्यांत तुमचा फंड अंदाजे १,१६,०५,३८८ रुपये होईल. या कालावधीत तुम्ही एकूण ७,५६,००० रुपये जमा कराल. तुम्हाला २० टक्क्यांऐवजी 15 टक्के परतावा मिळाला तरीही तुम्हाला जवळपास ५३ लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला कमी वेळात कोट्यधीश व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल.

म्युच्युअल फंडातून उत्तम रिटर्न
दरम्यान, असे काही फंड आहेत ज्यांनी २० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. आजकाल म्युच्युअल फंडाविषयी जवळपास सर्वांनाच माहिती असते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीद्वारे तुम्ही दररोज १०० रुपये गुंतवून सुरुवात करू शकता. अशाप्रकारे, लहान सुरुवात करूनही तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: If you want to become a millionaire save 100 rupees every day know this investment formula mutual funds sip investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.