कोविड महामारीच्या संकटकाळात अनेकांनी मोबाईल वॉलेटचा भरपूर प्रमाणात उपयोग केला आहे. मागील ६ वर्षापासून पेटीएम(Paytm) चा वापर वाढलेला आहे. परंतु अनेकदा घाईगडीत तुमच्याकडून मित्राला अथवा नातेवाईकांना पैसे पाठवताना कोणत्या अज्ञात व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात. घाईनं तुम्ही पैसे पाठवता पण ते परत कसे मिळवायचे याची चिंता सतावते. जर तुमच्याकडूनही अशाप्रकारे चूक झाली असेल आणि चुकीच्या व्यक्तीकडे पैसै गेले असतील तर काळजी करू नका. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
कसे होतात चुकून पैसे ट्रान्सफर?
पेटीएम किंवा अन्य मोबाईल वॉलेटमधून एखाद्याला पैसै पाठवताना दुसरीकडे पैसे पाठवले जातात. त्यामागे ३ कारणं आहेत. एखाद्याची माहिती भरताना तुमच्याकडून चूक होऊ शकते. मित्राला, नातेवाईकाला पैसे पाठवताना त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये घोळ होऊ शकतो. किंवा असंही होतं ठराविक रक्कम पाठवण्याऐवजी तुम्ही जास्त रक्कम पाठवता. किंवा तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची असते.
पेटीएम नियम काय सांगतो?
पेटीएमने स्पष्ट केलंय की, जर कोणताही व्यक्ती दुसऱ्याला चुकून काही रक्कम पाठवतो. तर पेटीएमकडून हे पैसे परत येऊ शकत नाहीत. नियमांनुसार कोणत्या खात्यातील पैसे त्याच्या परवानगीशिवाय काढले जाऊ शकत नाहीत. अशावेळी ज्या व्यक्तीच्या खात्यात ही रक्कम गेली आहे. त्या व्यक्तीची परवानगी घेणं गरजेचे आहे.
पैसे परत कसे मिळवाल?
जर चुकून अज्ञात व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले असतील तर तुम्ही थेट त्या व्यक्तीशी बोलून ते पैसे परत मागू शकता. जर पैसे एखाद्या कंपनीला पाठवले असतील तर पेटीएमद्वारे पाठवलेल्या ट्राजेक्शनचा पुरावा दाखवला जाऊ शकतो. जर कोणत्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले असतील तर तुम्ही बँकेशी संपर्क साधून ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेलेत त्याच्याविषयी माहिती मिळवू शकता.
तक्रार नोंद करू शकता?
जर तुम्हाला त्या व्यक्तीचा पत्ता मिळाला नाही. तर पेटीएम कस्टमर केअरशी संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंद करून त्या व्यक्तीची माहिती घेऊ शकता. जर संपर्क केल्यानंतरही तो व्यक्ती पैसे देण्यास नकार देत असेल तर व्यवहाराचा पुरावा दाखवून तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. अशा कोणत्याही व्यवहाराबाबत पेटीएम संबंधित व्यक्तीची मदत करण्यासाठी तयार आहे. परंतु त्याची सुरुवात तेव्हाच होऊ शकते जेव्हा पैसे मिळालेला व्यक्ती त्याची परवानगी देईल.
पेटीएमचा सल्ला काय आहे?
अज्ञात व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे पाठवल्यानंतर होणारा त्रास लक्षात घेता कधीही पैसे ट्रान्सफर करताना सतर्कता बाळगा. जर तुम्ही कोणाला मोठी रक्कम पाठवत असाल तर सुरुवातीला छोटी रक्कम पाठवून त्याला ती पोहचली आहे की नाही याची खात्री करून घ्या. कोणत्याही नव्या व्यवहाराबाबत माहिती भरताना एकदा क्रॉसचेक करून घ्या