Lokmat Money > बिझनेस न्यूज > पैसे तयार ठेवा! 'या' सरकारी कंपनीचा IPO येण्याच्या तयारीत, कमाईची आहे संधी 

पैसे तयार ठेवा! 'या' सरकारी कंपनीचा IPO येण्याच्या तयारीत, कमाईची आहे संधी 

आयपीओमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 12:46 PM2024-01-06T12:46:33+5:302024-01-06T12:46:50+5:30

आयपीओमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

IIFCL IPO News government company prepares for an IPO huge earning opportunity for investors | पैसे तयार ठेवा! 'या' सरकारी कंपनीचा IPO येण्याच्या तयारीत, कमाईची आहे संधी 

पैसे तयार ठेवा! 'या' सरकारी कंपनीचा IPO येण्याच्या तयारीत, कमाईची आहे संधी 

IIFCL IPO News: आयपीओमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, सरकारी कंपनी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) आयपीओ लाँच करण्याचा विचार करत आहे. कंपनीचे एमडी पीआर जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आर्थिक वर्षात आयपीओद्वारे लिस्ट करण्याच्या योजनेवर काम केलं जात आहे.

काय म्हणाले कंपनीचे एमडी?

"आम्ही लिस्टिंगची तयारी करत आहोत. ते पुढील आर्थिक वर्षात केले जाण्याची शक्यता आहे." असं आयआयएफसीएलच्या स्थापना दिनानिमित्त पीआर जयशंकर म्हणाले. कंपनी लवकरच सल्लागार प्रक्रिया सुरू करेल आणि त्यासाठी सरकारसह विविध मंजुरी आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आयपीओद्वारे किती हिस्सा विकण्याचं नियोजन आहे, या प्रश्नावर पीआर जयशंकर म्हणाले की, सविस्तर चर्चेनंतर यावर निर्णय घेतला जाईल. आत्तापर्यंत IIFCL ची 100 टक्के मालकी भारत सरकारकडे आहे.

1500 कोटी रुपयांपार होणार नफा

आयआयएफएलचे एमडी पीआर जयशंकर यांनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा नफा 1,500 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये निव्वळ नफा दुप्पट वाढून 1,076 कोटी रुपये झाला आहे. स्थापनेपासून, कंपनीनं 750 पायाभूत प्रकल्पांना 2.5 लाख कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. कंपनीनं डिसेंबर 2023 पर्यंत 30,315 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं आहे. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतची मागणी लक्षात घेता, मार्च 2024 पर्यंत कर्ज मंजूरी 40,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल.

कंपनीचे ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए रेश्यो सतत घसरत आहे आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ते अनुक्रमे 3.77 टक्के, 0.85 टक्के होते. पुढील वर्षीच्या नफ्याबद्दल विचारलं असता जयशंकर म्हणाले की कंपनीचे लक्ष्य 2,000 कोटी रुपये असल्याचं त्यांनी नमूद केलं.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: IIFCL IPO News government company prepares for an IPO huge earning opportunity for investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.