Lokmat Money > बिझनेस न्यूज > काय सांगता! WhatsApp वर मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज, 'या' कंपनीने केली मोठी घोषणा

काय सांगता! WhatsApp वर मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज, 'या' कंपनीने केली मोठी घोषणा

आता तुम्हाला तुमच्या व्यावसायासाठी WhatsApp वर १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 04:42 PM2023-05-04T16:42:53+5:302023-05-04T16:43:04+5:30

आता तुम्हाला तुमच्या व्यावसायासाठी WhatsApp वर १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

iifl finace start new facility for get upto 10 lakhs rupees business loan on whatsapp | काय सांगता! WhatsApp वर मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज, 'या' कंपनीने केली मोठी घोषणा

काय सांगता! WhatsApp वर मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज, 'या' कंपनीने केली मोठी घोषणा

आता कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता WhatsApp वर १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं. या संदर्भात एका कंपनीने घोषणा केली आहे.  हे व्यवसाय कर्ज असेल, जे त्वरित मंजूर केले जाईल. यासाठी फार काळजी करण्याची गरज नाही. IIFL फायनान्सने आपल्या ग्राहकांना WhatsApp वर १० लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसाय कर्जासाठी त्वरित मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयएफएल फायनान्सचे व्हाट्सएपवरील व्यवसाय कर्ज हा एमएसएमई कर्ज उद्योगातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे, जेथे कर्जाच्या अर्जापासून ते मनी ट्रान्सफरपर्यंत १००% कर्ज डिजिटल पद्धतीने केले जाते. भारतातील ४५० मिलियनहून अधिक WhatsApp वापरकर्ते IIFL Finance कडून या २४x७ एंड-टू-एंड डिजिटल कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

१० मिलियन ग्राहकांसह IIFL ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल NBFC पैकी एक आहे. त्यापैकी बहुतांश बँकांशी जोडलेले नाहीत. त्यातून लघु आणि लघु उद्योगांना कर्ज दिले जाते. त्यांच्या अनेक शाखा आहेत आणि डिजिटलही उपलब्ध आहेत.

700 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज; जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी?

WhatsApp सुविधेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जर तुमचा अर्ज सर्व तपशीलांशी जुळत असेल तर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही 9019702184 वर “हाय” पाठवून प्रक्रिया सुरू करू शकता. ही एक पेपरलेस प्रक्रिया असेल. IIFL फायनान्स सध्या १ लाख MSME क्रेडिट चौकशी त्यांच्या WhatsApp कर्ज चॅनेलद्वारे हाताळण्यास सक्षम आहे.

आयआयएफएलचे बिझनेस हेड भारत अग्रवाल म्हणाले, IIFL फायनान्सने WhatsApp वर सोप्या पद्धतीने पेपरलेस कर्जाचा अर्ज आणि वितरणाचा गुंतागुंतीचा प्रवास Whatsapp च्या माध्यामातून सुलभ करण्यात आला आहे. त्यात लहान व्यावसायिकांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: iifl finace start new facility for get upto 10 lakhs rupees business loan on whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.