Join us

पुण्याची नेहा नारखेडे 13 हजार कोटींची मालकीन; देशातील श्रीमंतांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 4:49 PM

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही ११ वी वार्षिक रँकिंग आहे...

पुणे : बुधवारी IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 जाहीर झाली. त्यामध्ये गौतम अदानी देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. भारतात 2022 मध्ये एक हजार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या प्रथमच 1 हजार 100 वर पोहोचली आहे.

या यादीत पुण्यातील कॉन्फ्लुएंट या स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सहसंस्थापक नेहा नारखडे या ३७ वर्षीय मराठमोळ्या महिलेने स्थान मिळवले आहे. नेहा नारखडे यांनी भारताच्या सर्वांत कमी वयाच्या सेल्फ मेड वुमन आंत्रप्रेन्योरच्या यादीत स्थान मिळवले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही ११ वी वार्षिक रँकिंग आहे.

बुधवारी जाहीर झालेल्या IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, नेहा नरखडे या देशातील १० सर्वांत श्रीमंत भारतीय महिलांमध्ये ८व्या स्थानावर आहेत. ३७ वर्षीय नेहा नरखेडेंची एकूण संपत्ती तब्बल १३ हजार ३८० कोटी आहे. नेहा नारखेडेचे पुण्यात लहानाची मोठी झाली. नेहा यांनी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेज, एससीटीआरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. नंतर त्या जॉर्जिया टेक येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी २००६ साली परदेशी गेल्या.

नारखेडे यांनी सुरुवातीला ओरॅकल आणि नंतर लिंक्डइन येथे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी कॉन्फ्लुएंट या कंपनीची स्थापना केली. पुढे २०१४ साली नेहा आणि त्यांची लिंक्डइन कंपनीतील दोन सहयोगी मैत्रिनींनी कॉन्फ्लुएंट सुरू करण्यासाठी कंपनी सोडली.

टॅग्स :पुणेअमेरिकापैसा