Join us

IKEA करणार भारतात ५ हजार कोटींची गुंतवणूक; उत्तर प्रदेश सरकारनं दिला ८५० कोटींत भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 1:00 PM

IKEA first retail outlet  : २०२५ पर्यंत कंपनी करणार १०,५०० कोटींची गुंतवणूक, त्यापैकी अर्धी गुंतवणूक केवळ उत्तर प्रदेशात

ठळक मुद्दे२०२५ पर्यंत कंपनी करणार १०,५०० कोटींची गुंतवणूकएकूण गुंतवणूकीपैकी अर्धी गुंतवणूक केवळ उत्तर प्रदेशात

IKEA first retail outlet  : फर्निचर तयार करणारी स्वीडनची कंपनी IKEA भारतात ५ हजार कोटी रूपयांची गुतवणूक करणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं त्यांना ५० हजार चौरस मीटरचा भूखंडही दिला आहे. कंपनी या भूखंडावर आपलं रिटेल आऊटलेट सुरू करेल. तसंत या भूखंडासाठी IKEA या कंपनीनं उत्तर प्रदेश सरकारला ८५० कोटी रूपयांचा भरणा केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा भूखंड नोएडा सेक्टर ५१ मध्ये आहे. एका कार्यक्रमादरम्यान सरकारनं हा भूखंड कंपनीला दिला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मंत्रिमंडळातील मंत्री सतीश महाना हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. "अथॉरिटीला या भूखंडाच्या बदल्यात ८५० कोटी रूपये मिळाले आहे. IKEA ही कंपनी पुढील सात वर्षांमध्ये ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल," अशी माहिती नोएडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितू महेश्वरी यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे २ हजार नवे रोजगार निर्माण होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ५६ कोटींची स्टॅम्प ड्युटीया कार्यक्रमात IKEA इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बेटजेल, सीएफओ प्रीत धुपर आणि उत्तर प्रदेशचे मउख्य सचिव आरके तिवारी यांच्यासह अन्य लोकं उपस्थित होती. या व्यवहारामधून उत्तर प्रदेश सरकारला ५६ कोटी रूपयांची स्टॅम्प ड्युटी मिळाली असल्याची माहिती नोएडा अथॉरिटीनं दिली. यापूर्वी IKEA नं उत्तर प्रदेश सरकारसोबत एक करार केला होता. यानुसार राज्यातील नोएडा आणि अ्य शहरांमध्ये ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. २०२५ या वर्षापर्यंत एकूण २५ आऊटलेट सुरू करण्याची IKEA चं ध्येय आहे. यामध्ये एकूण १० हजार ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाईल. यापैकी अर्धी गुंतवणूक केवळ उत्तर प्रदेशात होणार आहे. 

टॅग्स :उत्तर प्रदेशयोगी आदित्यनाथगुंतवणूक