Join us

आयएलएफएसने वसूल केले १,३१० कोटींचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:03 AM

वसूल झालेल्या या रकमेमध्ये १,०५० कोटी हे थकबाकीदार कंपन्यांकडून, तर २६० कोटी भांडवली गुंतवणूकीतून मिळाले आहेत, असे शपथपत्रात म्हटले आहे

नवी दिल्ली : कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या आयएल अँड एफएस फायनान्शियल सर्व्हिसेसने (आयएलएफएस) आपल्या थकीत कर्जापैकी १,३१० कोटी ३० कर्जदार कंपन्यांकडून वसूल केले आहे. ही माहिती स्वत: कंपनी व्यवहार मंत्रालयाने नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपेलेट ट्रायब्युनलकडे (एनसीएलएटी) दाखल केलेल्या एका शपथपत्रात उघड केली आहे.

वसूल झालेल्या या रकमेमध्ये १,०५० कोटी हे थकबाकीदार कंपन्यांकडून, तर २६० कोटी भांडवली गुंतवणूकीतून मिळाले आहेत, असे शपथपत्रात म्हटले आहे. वसुलीनंतर ३० नोव्हेंबर, २०१६ रोजी आयएआयएनजवळ एकूण १,४५० कोटी रोख शिल्लक होती, असेही शपथपत्रात म्हटले. आयएफआयएनने पाच त्रयस्थ कर्जदार कंपन्यांसोबत तडजोड करून ६१०० कोटी मुद्दल व व्याज वसूल करण्यासाठी बोलणी सुरू केली होती. त्यापैकी १,३१० कोटी वसूल झाले आहेत. १ आॅक्टोबर, २०१८ रोजी आयएफआयएनचे एकूण थकीत कर्ज ८,३६५ कोटी होते, असे शपथपत्रात म्हटले आहे.इन्फ्र ास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस व तिच्या उपकं पन्यांकडे बँका व वित्तीय संस्थाचे ९१,००० कोटी कर्ज जुलै, २०१८ मध्ये थकीत झाले व कंपनी बंद पडली. त्यावर सरकारने उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नेमले. हे मंडळ एनसीएलटीमार्फत कर्जाची वसुली करून या समूहाला तारण्याचा प्रयत्न करीत आहे.