Lokmat Money > बिझनेस न्यूज > मी कंगाल झालोय! अनिल अंबानींचा न्यायालयासमोर दावा

मी कंगाल झालोय! अनिल अंबानींचा न्यायालयासमोर दावा

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात झालेल्या उपथापालथीमुळे अनिल अंबानी यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते.  ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 11:29 AM2020-02-08T11:29:45+5:302020-02-08T11:35:29+5:30

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात झालेल्या उपथापालथीमुळे अनिल अंबानी यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते.  ​​​​​​​

I'm now poor! Anil Ambani's claim in the court | मी कंगाल झालोय! अनिल अंबानींचा न्यायालयासमोर दावा

मी कंगाल झालोय! अनिल अंबानींचा न्यायालयासमोर दावा

Highlightsअनिल अंबानी यांनी आपले निव्वळ उत्पन्न शून्य झाले असून, आपण दिवाळखोर झालो आहेत, अशी माहिती न्यायालयाला दिलीभारतीय टेलिकॉम क्षेत्रात झालेल्या उपथापालथीमुळे अनिल अंबानी यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते.  ​​​​​​​2012 मध्ये अनिल अंबानी यांच्या गुंतवणुकीची एकूण किंमत 7 अब्ज डॉलर हून अधिक होती. मात्र आता तिचे बाजारमूल्य 8.9 कोटी डॉलर म्हणजेच 623 कोटी रुपये एवढेच उरले आहे.

लंडन - एकेकाळी जगातील गर्भश्रीमंतांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनिल आंबानींची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. इंग्लंडमधील एका न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावेळी अनिल अंबानी यांनी आपले निव्वळ उत्पन्न शून्य झाले असून, आपण दिवाळखोर झालो आहेत, अशी माहिती न्यायालयाला दिली आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात झालेल्या उपथापालथीमुळे अनिल अंबानी यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. 

चीनमधील बँकांच्या 68 कोटी डॉलर ( 4 हजार 760 कोटी रुपये) कर्जाप्रकरणी लंडनमधील न्यायालयात सुनावणीदरम्यान अंबानी यांनी ही माहिती दिली. चीनमधील तीन बँकांनी अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनला 925.20 दशलक्ष डॉलर (सुमारे 6 हजार 475 कोटी) एवढे कर्ज दिले होते. कर्ज घेताना अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती. मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांची कंपनी कर्जभरणा करण्यात अपयशी ठरल्याने थकबाकीदार ठरली होती. 



अनिल अंबानी यांच्याकडे 11 आलिशान कार, एक खासगी विमान, एक यॉट आणि दक्षिण मुंबईतील महागड्या परिसरात पेंट हाऊस असल्याचा दावा बँकांच्या वकीलांनी केला. त्यानंतर अनिल अंबानी आपण वैयक्तिकरीत्या दिवाळखोर झाल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांनी आपली दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी तसा अर्ज केला आहे का? अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. त्यावर अंबानींच्या वकिलांच्या पथकामध्ये सहभागी असलेले ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी नाही असे उत्तर दिले. एकंदरीत परिस्थिती पाहता अनिल अंबानी हे 70 कोटी डॉलर जमा करण्याच्या स्थितीत नाहीत, असा दावा वकिलांनी कोर्टात केला. 

 दरम्यान, अडचणीच्या वेळी कुटुंबातल्या अन्य सदस्यांकडून मदत केली जात असल्याचे उदाहरण बँकांच्या वकिलांनी दिले. त्यावर अनिल अंबानींकडे आई कोकिलाबेन, पत्नी टीना अंबानी, मुलगे अनमोल आणि अंशुल यांच्या संपत्तीची आणि शेअर्सची काही माहिती नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. 

अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा

अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता

अनिल अंबानी यांचे घर सोडून कुठेही चर्चेस तयार : राहुल गांधी

भारत सरकारने स्पेक्ट्रम देण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलांचा परिणाम भारतीय टेलिकॉम क्षेत्रावर झाला होता. 2012 मध्ये अनिल अंबानी यांच्या गुंतवणुकीची एकूण किंमत 7 अब्ज डॉलर हून अधिक होती. मात्र आता तिचे बाजारमूल्य 8.9 कोटी डॉलर म्हणजेच 623 कोटी रुपये एवढेच उरले आहे. आता देणी भागवण्याचा विचार केल्यास त्यांच्याकडे एकूण संपत्ती शून्यावर येते. त्यामुळे एकेकाळी श्रीमंत उद्योगपती असलेले अनिल अंबानी आज गरीब झाले आहेत.  

Web Title: I'm now poor! Anil Ambani's claim in the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.