मुंबई - एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्यांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा आहे. लोकांना वास्तव्यासाठी ना पुरेशी जागा आहे, ना शुद्ध हवा. कोरोनाच्या संकटामुळे या दाटीवाटीच्या क्षेत्रांबद्दलची काळजी आणखी वाढली आहे. हा आपल्या प्रत्येकासाठी ‘वेक अप कॉल’आहे. इथले रहिवासी नवीन भारताचाच एक भाग आहेत हे मान्य करून झोपड्यांचा अभिमानास्पद पुनर्विकास करा, असे कळकळीचे आवाहन सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी यापूर्वी केले होते. रतन टाटा हे नेहमीच देश आणि देशातील गरिबांचा विचार करतात. त्यामुळेच, त्यांच्या नावाने अनेक स्लोगन, घोषवाक्य व्हायरल होतात. मात्र, ते माझे मत नसल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. आताही, टाटा यांनी ट्विट करुन फेक न्यूजबद्दल निराशा व्यक्त केली आहे. तसेच, मला याची भीती वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.
रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये आलेल्या फेक न्यूजबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. माझ्या नावाने सोशल मीडियावर फेक न्यूज पसरत आहेत, पण आपण त्या बातमीचा स्त्रोत काय? याची खात्री करावी, असे आवाहन रतन टाटांनी केले आहे. माझ्या चित्रासह एक कोट शेअर करण्यात येतो, त्या कोटला ग्राह्य धरून त्याची बातमी बनविली जात आहे. मात्र, असे कुठलेही स्टेटमेंट केले नाही, असे म्हणत रतन टाटा यांनी एका बातमीचा फोटो शेअर केला आहे. तसेच, माझ्याप्रमाणे अनेकांना या फेकन्यूजचा त्रास होत असल्याचेही टाटांनी म्हटलंय.
I’m afraid this too, has not been said by me. I will endeavour to call out fake news whenever I can, but would encourage you to always verify news sources. My picture alongside a quote does not guarantee me having said it, a problem that many people face. pic.twitter.com/pk0S75FxPA
— Ratan N. Tata (@RNTata2000) May 3, 2020
'२०२० हे जीवंत राहण्याचे वर्ष आहे, नफा-नुकसानाची काळजी करु नये' हे वाक्य कोट करुन रतन टाटांचा संदेश असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रतन टाटांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यापूर्वी उद्योजकांबद्दलचा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत होता. त्यावेळीही, टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्टीकरण देताना, हा मेसेज मी दिला नाही, हे माझे स्टेटमेंट नाही, असे टाटांनी म्हटले होते.
दरम्यान, रतन टाटा हे नेहमीच देश आणि देशातील गरिबांचा विचार करतात. त्यामुळेच, त्यांच्या नावाने सुविचार पेरले जातात. मात्र, याचा त्रास रतन टाटांना होत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत टाटा ग्रुपने देशासाठी १५०० कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. तसेच, ‘फ्यूचर ऑफ डिझाइन अॅण्ड कन्स्ट्रक्शन’ या विषयावर पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये रतन टाटा संबोधित करत होते. त्यावेळी, देशातील झोपडपट्टी विकास आणि गरिबी यावर त्यांनी भाष्य केले होते. कोरोनाच्या संकटामुळे दाटिवाटीच्या क्षेत्रांबद्दलची काळजी आणखी वाढली आहे. हा वेक अप काँल असून आता तरी आपण जागे झाले पाहिजे. इथले रहिवासी नवीन भारतचाच एक भाग आहेत हे मान्य करून झोपड्यांचा अभिमान वाटेल अशा पद्धतीने पुनर्विकास व्हायला हवा. त्यांची लाज बाळगण्याचे कारण नाही असेही रतन टाटा त्यांनी नमूद केले. त्यानंतर, आता रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशवासियांना आवाहन केलं आहे. यंदाचे २०२० हे वर्ष