Join us

मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 11:25 AM

GDP: भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून हळूहळू सावरत असून,  चीनवर मात करेल, असे imf ने म्हटले आहे.

ठळक मुद्देभारत व चीन सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था - IMFभारत २०२१ मध्ये चीनच्या तुलनेत सरस कामगिरी करेल - IMFभारतातील आर्थिक व्यवहार सुरळीत - IMF

नवी दिल्ली: कोरोना संकटावर अद्यापही कोणत्याही देशाला नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालल्याचे दिसत आहे. मात्र, भारतीयअर्थव्यवस्था कोरोना संकटातून हळूहळू सावरत असून,  चीनवर मात करत भारताचा विकास दर (GDP) १२.५ टक्के असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. (imf report says india gdp in 2021 will stronger than china)

सन २०२० मध्ये कोरोना संकटामुळे भारताचा 'जीडीपी' उणे ८ टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र, उद्योगधंदे हळूहळू सावरत असून, जीडीपी वेगवान होऊन भारत २०२१ मध्ये चीनच्या तुलनेत सरस कामगिरी करेल. भारताचा विकासदर विक्रमी १२.५ टक्के इतका असेल, असे नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Fact Check: नोटबंदीत बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याची RBI पुन्हा संधी देतेय? वाचा, सत्य

भारतातील आर्थिक व्यवहार सुरळीत

बाजारपेठा पूर्वपदावर येत असल्याचे मागील काही महिन्यात दिसून आले आहे. भारतातील आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आढाव्यानुसार जीडीपीबाबत नाणेनिधीने १ टक्का वाढ केल्याचे नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञ गिता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. तर, सन २०२२ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी वृद्धिंगत होईल, असेही नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

भारत व चीन सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

आशिया खंडातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या भारत आणि चीन यांच्यात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून चढाओढ आहे. गेल्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे खीळ बसली होती. मात्र, या कठीण परिस्थितीत देखील चीनी अर्थव्यवस्था वाढली होती. चीनने सकारात्मक जीडीपी नोंदवला होता, असे म्हटले जात आहे. 

केवळ २ दिवसांत बाबा रामदेव यांना भरघोस नफा; 'या' कंपनीचे १० टक्के शेअर्स वाढले

दरम्यान, चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर १०.५ टक्के राहण्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लावण्याकरिता रिझर्व्ह बँक कायमच तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर द्वैमासिक पतधोरणाची घोषणा दास यांनी केली, त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतचीनव्यवसायनिर्मला सीतारामनकेंद्र सरकार