Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus: “कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता

Coronavirus: “कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता

Coronavirus: कोरोनाला  रोखण्यासाठी सार्वत्रिक लसीकरणाला गती देण्याची गरज आहे, असे IMF ने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 05:32 PM2021-10-15T17:32:47+5:302021-10-15T17:34:01+5:30

Coronavirus: कोरोनाला  रोखण्यासाठी सार्वत्रिक लसीकरणाला गती देण्याची गरज आहे, असे IMF ने म्हटले आहे.

imf says new corona variant have increased uncertainty risks to global economy | Coronavirus: “कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता

Coronavirus: “कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट अद्यापही कायम असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ते नोव्हेंबर महिन्यात तिसरी लाट धडकू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवरील धोका लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक लसीलाही मान्यता देण्यात आलेली आहे. यातच आता कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या उदयामुळे अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीच्या गतीवर परिणाम होण्याची भीती आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. 

कोरोना विषाणूच्या उदयामुळे अनिश्चितता वाढली आहे आणि पुनरुज्जीवनाच्या मार्गातही जोखीम वाढली आहे. कोरोनाचे संकट दारिद्र्य आणि असमानता वाढवत आहे. तर दुसरीकडे हवामान बदल आणि इतर सामान्य आव्हाने यांचाही दबाव वाढत आहे. ज्याकडे आपण सर्वांनी तत्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे IMF ने वार्षिक बैठकीनंतर म्हटले आहे. यावेळी भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही उपस्थित होत्या, असे सांगितले जात आहे. 

सार्वत्रिक लसीकरणाला गती देण्याची गरज 

कोरोनाला  रोखण्यासाठी सार्वत्रिक लसीकरणाला गती देण्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीत परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि तत्काळ कारवाईवरही भर दिला पाहिजे, असे IMF वार्षिक बैठकीचे अध्यक्षपद भूषवलेल्या स्वीडनच्या अर्थमंत्री मॅग्डालेना अँडरसन यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षात हवामान बदलाचा दबावही वाढत आहे आणि त्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. पॅरिस कराराच्या अनुषंगाने हवामानविषयक कारवाईला अधिक गती देण्यासाठी एका मजबूत वचनबद्धतेची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. 

दरम्यान, आयएमएफने जागतिक आर्थिक पुनरुज्जीवनात सध्याच्या कोरोना व्हायरस महामारी आणि महागाईच्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे. श्रीमंत देशांनी गरीब देशांमध्ये कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लसीकरणाला गती देण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन जागतिक संघटनेने केले.
 

Web Title: imf says new corona variant have increased uncertainty risks to global economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.