आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जागतिक मंदीबाबत इशारा दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटात जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनमधील मंदीमुळे 2023 हे वर्ष 2022 पेक्षा अधिक कठीण असेल, असंही त्यांनी नमूद केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग मंदीच्या सावटाखाली असेल. जो देश मंदीच्या सावटाखाली येणार नाही, तेथील कोट्यवधी लोकांना मंदीसारखं जाणवेल, असं बीबीसीनं रविवारी सीबीएस न्यूजला जॉर्जिया यांच्या हवाल्यानं सांगितलं.
आयएमएफचा इशारा
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला 2023 मध्ये एक कठीण सुरूवात करावी लागेल. झिरो कोविड पॉलिसीमुळे चीनची अर्थव्यवस्था 2022 मध्ये नाट्यमय पद्धतीनं धीमी झाली. 40 वर्षांत पहिल्यांदा 2022 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. असं पहिले झालं नसल्याचं आयएमएफ प्रमुखांनी सांगितलं.
निगेटिव्ह इंपॅक्ट
चीनसाठी पुढील काही महिने कठीण असतील आणि चीनच्या विकासावर नकारात्मक प्रभाव होतील, क्षेत्रावर नकारात्मक प्रभाव होती, जागतील विकासावर प्रभाव नकारात्मक होतील. हा इशारा रशिया युक्रेन युद्ध, अधिक व्याज दर, चीनमधील कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर पुन्हा दबाव वाढल्याचंही क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या.