Join us

साखरपुड्यानंतर लगेच देवदर्शन, अनंत अंबानी भावी पत्नीसह तिरुपती बालाजी चरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 9:12 PM

अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी हा सुखद सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपलं तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं आहे

उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गेल्याच आठवड्यात मुंबईतील 'अँटेलिया' निवासस्थानी कुटुंब, मित्र आणि आदरणीय परंपरांद्वारे औपचारिकपणे साखरपुडा संपन्न झाला. गुजराथी हिंदू कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोल धना आणि चुनरी विधी यासारख्या जुन्या परंपरा कौटुंबिक मंदिरात आणि समारंभाच्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पाडल्या गेल्या. कुटुंबांनी भेटवस्तू आणि शुभेच्छा, सौहार्द आणि आनंदाची देवाणघेवाण केली. जेवढ्या थाटामाटा हा साखरपुडा झाला, तितक्याच परंपराही जपल्याचं पाहायला मिळालं. या साखरपुड्यानंतर आता हे जोडपं देवदर्शनला गेलं आहे.

अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी हा सुखद सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपलं तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं आहे. आज प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजताच्या सुमारास अनंत आणि राधिका यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात विधीव्रत पूजा-आरतीही केली. यावेळी, अनंत यांनी पांढरं शुभ्र धोतर व सदरा तर राधिकाने सलवार-कुर्ता परिधान केला होता. त्यांच्या सोबतीला अंबानी कुटुंबाचे काही स्नेही होते. तसेच मंदिर देवस्थानाचे विश्वस्त देखील होते.

अंबानी हे देशातील आणि जगातील प्रसिद्ध असं गर्भश्रीमंत कुटुंब आहे. मात्र, अंबानी यांच्याकडून कायम आपल्या परंपरा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. अनंत यांच्या साखरपुडा सोहळ्यातही याचा अनुभव सर्वांना पाहायला मिळाला. गोल धना ही परंपरा साखपुडा सोहळ्यात दिसून आला. गोल धना याचा शाब्दिक अर्थ गुळ आणि धणे - गुजराथी परंपरेतील लग्नाआधीचा समारंभ आहे, जो लग्नापूर्वीचा विधी आहे. या वस्तू वराच्या ठिकाणी वितरीत केल्या जातात जिथे कार्यक्रम होतो. वधूचे कुटुंब वराच्या निवासस्थानी भेटवस्तू आणि मिठाई घेऊन येतात आणि नंतर जोडपे अंगठ्याची देवाणघेवाण करतात. अंगठ्याची देवाणघेवाण केल्यानंतर जोडपे त्यांच्या वडिलांकडून आशीर्वाद घेतात. 

टॅग्स :तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटरिलायन्सव्यवसाय