नवी दिल्ली : दूध उत्पादनांच्या वेष्टनावरील ए १ व ए २ प्रकारातील दुधाचे दावे हटविण्यात यावेत, असे आदेश ‘भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणा’ने (एफएसएसएआय) ई-कॉमर्स कंपन्यांसह अन्न उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक संस्थांना दिले आहेत. वेष्टनावरील हे दावे दिशाभूल करणारे आहेत, असे ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे.
यासंबंधीचा ताजा आदेश ‘एफएसएसएआय’ने जारी केला आहे. त्यात म्हटले की, आमच्या तपासणीत असे आढळून आले आहे की, ए १ व ए २ ही तफावत दुधातील ‘बेटा-कॅसिन’ प्रथिनाच्या संरचनेशी संबंधित आहे. तथापि, नियमावलीत या तफावतीस मान्यताच नाही.