नवी दिल्ली : नोटाबंदीचा घेतलेला तडकाफडकी निर्णय आणि जीएसटीची घाईघाईत अंमलबजावणी करण्यात आल्याने जीडीपी वृद्धीवर प्रतिकूल परिणाम होईल, असा इशारा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा दिला आहे. नोटाबंदीमुळे जीडीपी वृद्धी दरात २ टक्के घट होईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी याअगोदरही दिला होता. चलनातून ८६ टक्के चलन बाद करणे आणि जीएसटी घाईघाईने लागू करण्याच्या निर्णयामुळे असंघटित आणि लघू क्षेत्राला फटका बसला आहे.
२५०० अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा जवळपास ४० टक्के आहे. भारतातील रोजगार क्षेत्रात असंघटित क्षेत्राचा वाटा ९० टक्के आहे. अत्यंत घाईगडबडीत घेण्यात आलेल्या या दोन्ही निर्णयांतील त्रुटी आता समोर येत आहेत, असे त्यांनी एका टीव्ही चॅनलला सांगितले.
>ऐतिहासिक गैरव्यवस्थापन
मागच्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी म्हणजे नोटाबंदी निर्णयाच्या दोन आठवड्यांनंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेतच नोटाबंदीचा निर्णय म्हणजे ऐतिहासिक गैरव्यवस्थापन आणि वैध लूट असून, त्यामुळे जीडीपी वृद्धी दरात २ टक्के घट होईल, असे म्हटले होते. एप्रिलमध्ये जीएसटीचे संसदेत समर्थन करताना त्यांनी अंमलबजावणीत येणाºया अडचणींबाबतही सावधानतेचा इशारा दिला होता.
नोटाबंदीच्या घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे जीडीपीवर आणखी परिणाम, निर्णयांतील त्रुटींचा परिणाम
नोटाबंदीचा घेतलेला तडकाफडकी निर्णय आणि जीएसटीची घाईघाईत अंमलबजावणी करण्यात आल्याने जीडीपी वृद्धीवर प्रतिकूल परिणाम होईल, असा इशारा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा दिला आहे. नोटाबंदीमुळे जीडीपी वृद्धी दरात २ टक्के घट होईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी याअगोदरही दिला होता.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:41 AM2017-09-20T01:41:36+5:302017-09-20T01:48:04+5:30