नवी दिल्ली : गव्हाच्या आयातीवर १० टक्के आयात शुल्क लावण्यात आल्याने भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या (एफसीआय) गोदामातील गहू बाजारात विक्रीस येण्याची आशा आहे. आयात शुल्क मार्च २०१६ पर्यंत लागू असेल.वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेची एक प्रत लोकसभेत सादर केली. या अधिसूचनेतहत सीमा शुल्क अधिनियम १९६२ च्या कलम १५९ तहत ३१ मार्च २०१६ पर्यंत गव्हाच्या आयातीवर १० टक्के या दराने आयात शुल्क लावण्यात आला आहे.सध्या गव्हाच्या आयातीवर शुल्क नव्हते. जागतिक बाजारपेठेत भाव कमी असल्याने व्यापारी सध्या गव्हाची आयात करीत आहेत. भारतीय बाजारात सध्या चांगल्या प्रतीच्या गव्हाची कमतरता आहे. २०१४-१५ च्या हंगामात गहू जोरदार पिकला. भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात गव्हाचा मुबलक साठा असताना गव्हाची आयात होत आहे.
गव्हाच्या आयातीवर आयात शुल्क
By admin | Published: August 07, 2015 9:56 PM