- सी. ए. उमेश शर्मा(करनीती - भाग २४९)अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, नुकतेच सरकारने जीएसटीसंबंधी काही सुचनापत्रे जारी केले आहेत. त्यात कोणत्या सुधारणा मंजूर झाल्या?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, नुकतीच जीएसटी परिषदेची बैठक झाली होती. त्यात जीएसटी कायद्यामध्ये खूप सुधारणा प्रस्तावित केलेल्या होत्या. त्यातील प्रस्तावित सुधारणांनाच ३० आॅगस्ट रोजी सुचना पत्रकांद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.अर्जुन : कृष्णा, जीएसटी कायद्याच्या कोणकोणत्या कलमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत?कृष्ण : अर्जुना, ह्या सुचनापत्रकांद्वारे जीएसटी कायद्यातच सुधारणा करण्यात आली आहे. कायद्यातील पुरवठा, नोंदणी, कंपोझिशन स्कीम, इनपूट टॅक्स क्रेडिट, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, रिफंड, डेबिट/क्रेडिट नोट, आयटीसीचे क्रॉस युटिलाईझेशन, इत्यादींमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शेड्युल १, २ आणि ३ मध्येही थोडे बदल करण्यात आले आहे.अर्जुन : कृष्णा, इनपूट टॅक्स क्रेडिटच्या कलमामध्ये काय सुधारणा झाली?कृष्ण : अर्जुना, इनपूट टॅक्स क्रेडिटच्या कलमामध्ये पुढील सुधारणा करण्यात आल्या :-१. एखाद्या करदात्याचा वाहतुकीचा व्यापर नसेल आणि त्याने वाहतुकीची सुविधा पुरविली आणि त्या वाहनाची क्षमता १३ सिटर पेक्षा कमी असेल तर त्या करदात्याला त्याचा आयटीसी मिळणार नाही. परंतु जर वाहनाची क्षमता १३ सिटर पेक्षा जास्त असेल आणि त्याचा उपयोग स्वत:च्या उपभोगासाठी केला नसेल तर त्या करदात्याला त्याचा आयटीसी मिळेल. उदा. एखाद्या कंपनीने त्याच्या कामगारांना कंपनीपासून रहिवासी स्थानापर्यंत वाहतुकीची सुविधा पुरविली आणि त्या वाहनांची क्षमता १३ सीटरपेक्ष जास्त असेल तर त्या कंवनीला त्यावरील आयटीसी मिळेल.२. वरील तरतुदीनुसार ज्या वाहनांवर आयटीसी मिळतो त्याच्या इन्शुरन्स रिपेअर्स आणि मेन्टेनन्सवर आयटीसी मिळेल.३. कामगारांना पुरवलेले अन्नपदार्थ, आरोग्य सेवा, प्रवास लाभ इ. संबंधी आयटीसी नियोक्त्याला उपलब्ध नव्हते. परंतु आता नियोक्त्याला ह्या सर्व वस्तू किंवा सेवा कामगारांना पुरविणे अनिवार्य असेल तर त्यावरील आयटीसी घेता येईल.४. जोपर्यंत सीजीएसटीचे संपूर्ण क्रेडिट वापरले जात नाही तोपर्यंत आयजीएसटीची लायबिलिटी भरण्यासाठी एसजीएसटीचे क्रेडिट वापरता येत नाही.५. आयजीएसटीचे दायित्व भरण्यासाठी अगोदर आयजीएसटीचे क्रेडिट वापरावे. त्यानंतर सीजीएसटीमध्ये काही क्रेडिट उर्वरित असेल, तर ते वापरावे व तरीही आयजीएसटीचे दायित्व भरण्यास येत असेल तर सीजीएसटी मधील संपूर्ण क्रेडिट वापरल्या नंतरच एसजीएसटीचे क्रेडिट वापरावे.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा, यातून काय शिकण्यासारखे आहे ?कृष्ण : अजुर्ना, शासनाने अजून जीएसटी कायद्यात सवलती देऊन, सुटसूटीत करून तो कायदा आणि करदाते, यांचे टॅक्सशी नाते फ्रेंडली होऊन तो टॅक्स करदात्याने हसत-खेळत भरला पाहिजे.
‘टॅक्स फ्रेंडली’ करदात्यांसाठी जीएसटीत महत्त्वाच्या सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:52 AM