रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI च्या माध्यमातून देवाणघेवाण करणाऱ्यांबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी सांगिलते की, UPI च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये एक वर्षात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा वाढून ३६ हजार कोटींवर पोहोचला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये हाच आकडा २४ हजार कोटी रुपये एवढा होता. रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयामध्ये डिजिटल पेमेंट अवेअरनेस विकची सुरुवात करताना शक्तिकांत दास यांनी सांगितले की, मुल्याच्या दृष्टीने हा व्यवहार ६.२७ लाख कोटी रुपये एवढा होतो.
फेब्रुवारी २०२२ मध्ये नोंदवण्यात ालेल्या ५.२६ लाख कोटी रुपयांपेक्षा हा आकडा १७ टक्के अधिक आहे. त्यांनी सांगितले की, मासिक डिजिटल व्यवहारातील देवणाघेवाण गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येक वेळी एक हजार कोटींच्या आकड्याला पार करत आहे. आरबीआय गव्हर्नरनी सांगितलं की, जेव्हापासून UPI आणि सिंगापूरमधील पेनाऊ यांच्यादरम्यान करार झाला आहे. तेव्हापासून अनेक देशांनी व्यवहारांसाठी असा करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गव्हर्नरनी सांगितलं की, किमान अर्धा डझन देश हे करार करतील. दास म्हणाले की, यूपीआय आणि पेनाऊ यांच्यातील कराराला १० दिवस झाले आहेत. यादरम्यान, सिंगापूरमधून पैसे पाठवल्याचे १२० आमि सिंगापूरमध्ये पैसे पाठवल्याचे २२ व्यवहार झाले आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की, आम्ही आपल्या व्यवहार प्रणालीचं आंतरराष्ट्रीयीकरण आणि भारत-सिंगापूरच्या प्रॉम्पट पेमेंट सिस्टिम यांच्यातील सीमापार लिंकेजसाठी अनेक पावलं उचलली आहेत.