रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) गुरुवारी अॅक्सिस बँकेला ९०.९२ लाख रुपये आणि मणप्पुरम फायनान्स या गोल्ड लोन देणाऱ्या कंपनीला ४२.७८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आदेशांचं पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली. त्यांनी केवायसी मार्गदर्शक तत्त्वांच्या कर्ज आणि जोखीम व्यवस्थापनावर काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. या नियमांचं पालन न केल्यानं बँकेला दंड ठोठावण्यात आला आल्याचं रिझर्व्ह बँकेनं आपल्या निवेदनाद्वारे म्हटलंय.
Axis Bank वर का कारवाई?
रिझव्र्ह बँकेनं (आरबीआय) जारी केलेल्या निवेदनाक असं म्हटलंय की, २ नोव्हेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यामुळे आरबीआयने बँकेला ९०.९३ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचं सांगण्यात आलंय. केवायसी संबंधित मार्गदर्शक तत्त्वं २०१६ चं पालन करण्यातील निष्काळजीपणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलंय.
ग्राहकांवर परिणाम नाही
अॅक्सिस बँकेवर दंड ठोठावण्याबाबतची माहिती शेअर करण्यासोबतच, आरबीआयनं हेही स्पष्ट केलंय की, निर्देशांच्या पालनातील त्रुटींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा उद्देश बँकेनं तिच्या ग्राहकांसोबत (Axis Bank Customers) केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम करणे हा अजिबात नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं.
मणप्पुरमवरही कारवाई
रिझर्व्ह बँकेनं अन्य निवेदनाद्वारे त्रिशूर-आधारित मणप्पुरम फायनान्सला ४२.७८ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती दिली. हा दंड ‘'नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी'च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केल्यामुळे लावण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेनं आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेडला केवायसी गाईडलाईन्स २०१६ च्या काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
Axis Bank, मणप्पुरम फायनान्सच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, RBI ची मोठी कारवाई, पाहा डिटेल्स
वाचा रिझर्व्ह बँकेनं का केली ही कारवाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 01:48 PM2023-11-17T13:48:04+5:302023-11-17T13:50:45+5:30