Join us

मोदी सरकारसाठी आली महत्वाची बातमी; भारत या यादीत अमेरिका-चीनपेक्षाही पुढे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 20:19 IST

सामान्य मान्सून आणि कृषी उत्पादनांमध्ये सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण मागणीत सुधारणा दिसून येत असल्याचे म्हटले आहे. 

क्रेडिट रेटिंग देणारी एजन्सी मुडीजकडून भारतासाठी दिलासा देणारी आकडेवारी आली आहे. मुडीजने २०२४-२५ साठी भारताचा विकासाचा वेगाचा अंदाज वाढविला आहे.  सामान्य मान्सून आणि कृषी उत्पादनांमध्ये सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण मागणीत सुधारणा दिसून येत असल्याचे म्हटले आहे. 

मूडीजने 2024 आणि 2025 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज वाढवला आहे. मूडीजने 2024 मध्ये वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर 2025 साठी भारताचा विकास दर अंदाज 6.4 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

IMF नुसार सर्वात वेगाने वाढणाऱ्या १० अर्थव्यवस्थांमध्ये भारतानंतर चीन दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर आला आहे. हे भारतासाठी महत्वाचे आहे. युद्धात गुरफटलेला रशिया 5 व्या स्थानावर आहे, तर आपल्या ताकदीने जगाला वेठीस धरणारा अमेरिका सातव्या स्थानावर आहे. 

भारत केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील वर्षीही जगातील सर्वात वेगाने वाढणारा विकास दर राहणार आहे. फिचच्या मते, खाजगी गुंतवणूक, मजबूत सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा खर्चामुळे भारताच्या वाढीला मदत झाली आहे.