- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आर्र्थिक वर्ष २०१८-१९ चा मार्च हा शेवटचा महिना चालू आहे. या वर्षात करकायद्यात खूप बदल झाले, तर मार्च २०१९ मध्ये करदात्यांनी जीएसटीत काय दक्षता घ्यावी ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, लवकरच करदाते वार्षिक रिटर्न भरणार आहेत आणि त्यांच्या खात्याचे आॅडिट होणार आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये झालेल्या चुका सुधारण्यासाठी करदात्यांना ही शेवटची संधी आहे. म्हणून करदात्यांने त्यांचे खाते रिटर्न सोबत रिकन्साईल करून घ्यावे.
अर्जुन : कृष्णा, या महिनाअखेरपर्यंत करदात्याने जीएसटीच्या कोणत्या प्रमुख गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे?
कृष्ण : अर्जुना, या महिनाअखेरपर्यंत करदात्याने जीएसटीच्या खालील प्रमुख गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
१. अमेंडमेन्टस/रेक्टिफिकेशन आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या जीएसटीआर १ आणि ३ बी मध्ये झालेल्या चुका सुधारण्याची ही अंतिम संधी म्हणजे मार्च २०१९ चे रिटर्न होय, तसेच करदात्याने त्याचे खाते रिकन्साईल करून घ्यावे.
२. पेंडिंग आयटीसी मिळवण्याची ही शेवटची संधी करदात्याने जीएसटीआर ३ बी मधील आयटीसी जीएसटीआर २ ए सोबत रिकन्साईल करावे आणि पुरवठादाराने आयटीसीसाठी अपलोड न केलेल्या ईन्व्हाईससाठी पुरवठादाराचे अनुकरण करावे.
३. जॉब वर्कसंदर्भात रिटर्न आयटीसी-०४ करदात्यांनी जुलै २०१७ डिसेंबर २०१८ च्या दरम्यानच्या क्वॉर्टरसाठी आयटीसी ०४ दाखल केला आहे की नाही. जॉबवर्ककडून मिळालेल्या वस्तूंची माहिती आणि मालकास पाठविलेल्या वस्तूंचे तपशील देऊन त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे.
४. टीडीएस रिटर्न : टीडीएस डिडक्ट करणाऱ्यांनी आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे टीडीएसचे रिटर्न भरणे आवश्यक आहे, जेणेकरून कॉऊंटर पार्टी आर्थिक वर्ष २०१८-१९ चे शेवटची जीएसटीआर ३बी भरण्यापूर्वी टीडीएस क्रेडिट प्राप्त करू शकेल.
५. टीडीएस क्रेडिट : मासिक जीएसटी पोर्टलवर जो टीडीएस क्रेडिट रिफ्लेक्ट झाला आहे. तो करदात्याने स्वीकारावा जेणेकरून टीडीएसची रक्कम कॅश लेजरमध्ये जमा होईल.
६. लेटर आॅफ अंडर टेकिंग (एलयूटी) : सर्व निर्यात करणाऱ्या करदात्यांनी एलयूटीमध्ये कर भरला नाही, तर त्यांना आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये एलयूटीमध्ये अर्ज करावा लागेल.
७. कंपोझिशन योजनेसाठी अर्ज : जर करदांत्याचा पुरवठा १.५ कोटीपर्यंत असेल, तर ते कंपोझिशन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
८. बांधकाम क्षेत्रावर नवीन जीएसटीच्या कर रचनेमुळे ३१ मार्च २०१९ ला क्लोजिंक स्टॉक आणि आयटीसीवर काय परिणाम होईल हे पाहावे.
अर्जुन : कृष्णा, ३१ मार्च २०१९ पूर्वी करदात्याने इतर कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांने पुढील गोेष्टींकडे लक्ष द्यावे.
१. आयकरामध्ये आर्थिक वर्ष २०१७-१८ चे बिलेटेड रिटर्न भरण्याची ३१ मार्च २०१९ ही शेवटची तारीख आहे.
२. आर्थिक वर्ष २०१६-१७ आणि २०१७-१८ चे रिव्हाईज रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१९ आहे.
३. पॅन होल्डरसाठी आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक आहे आणि त्याची शेवटची ३१ मार्च २०१९ आहे.
४. सर्व करदात्यांनी आयकरामधील कलम ८० मध्ये मिळणाºया डिडक्शनची मर्यादा तपासावी आणि ३१ मार्च २०१९ पर्यंत गुंतवणूक करावी.
५. ज्या करदात्याने १५ मार्च २०१९ पर्यंत अॅडव्हान्स कर दर भरला नसेल, तर त्यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत भरावा, जेणेकरून व्याज कमी लागेल.
६. वर्ष २०१८-१९ या आर्थिक वषार्साठी प्रोफेशनल कर भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१९ ही असेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, सर्व करदात्यांनी ३१ मार्चपर्यंत उर्वरित कामे करून घ्यावीत. ज्यांना कराचे पेमेंट करायचे असेल त्यांनीही वेळेवर करून घ्यावे. सर्व करदात्यांनी नवीन वर्षासह नवीन सुरळीत कर प्रणालीची सुरुवात करावी. म्हणून कायद्याच्या तरतुदींचे पालन करूनच कर भरावा, नाहीतर करदात्यांला भविष्यात परिणामांना सामोरे जावे लागेल.
जीएसटीची मार्च एण्डपूर्वी करायची महत्त्वाची कामे
कृष्णा, आर्र्थिक वर्ष २०१८-१९ चा मार्च हा शेवटचा महिना चालू आहे. या वर्षात करकायद्यात खूप बदल झाले, तर मार्च २०१९ मध्ये करदात्यांनी जीएसटीत काय दक्षता घ्यावी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:13 AM2019-03-25T01:13:32+5:302019-03-25T01:13:41+5:30