Join us  

मिश्र धातूच्या नावाखाली सफाईने सोन्याची आयात; केंद्र सरकारला ६३,००० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 9:19 AM

मिश्र धातूच्या आडून होणाऱ्या सोने आयातीवरील कर रचनेबाबत जागतिक विचार मंच ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’नेही (जीटीआरआय) चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : प्लॅटिनम आणि अन्य धातू मिसळवून बनविण्यात आलेल्या मिश्रधातूच्या (अलॉय) नावाखाली आयात शुल्क बुडवून मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जात असून त्यातून सरकारचे वर्षाला ६३,३३७ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

‘ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन’ने (एआयजेजीएफ) वाणिज्य मंत्रालयाकडे केलेल्या तक्रारींतून ही माहिती समोर आली आहे. मिश्र धातू आयात करून नंतर त्यातील सोने गलाई करून बाजूला काढले जाते व ते सवलतीत विकले जाते. ५ टक्क्यांपेक्षा अधिक सोने असलेल्या मिश्रधातूंवर सोन्याच्या प्रमाणानुसार स्वतंत्रपणे आयात कर लावण्यात यावा, अशी मागणी ‘एआयजेजीएफ’ने केली आहे.

जोरदार नफावसुलीमुळे तेजीच्या बाजाराची आपटी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.९४ लाख कोटींची घट

मिश्र धातूच्या आडून होणाऱ्या सोने आयातीवरील कर रचनेबाबत जागतिक विचार मंच ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’नेही (जीटीआरआय) चिंता व्यक्त केली आहे.

‘एआयजेजीएफ’चे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन केडिया यांनी सांगितले की, अलीकडे प्लॅटिनम

मिश्र धातूची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात तब्बल ८८ टक्के सोने मिसळलेले असते.

सोन्यावर १५ टक्के आयात कर लागतो. मात्र, मिश्र धातूवर फक्त

५ टक्के आयात कर आहे. त्यामुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे.

‘जीटीआरआय’ने म्हटले की, यूएईसोबतच्या मुक्त व्यापार करारानुसार तेथून सध्या ५ टक्के करावर सोने आयात होत आहे. आगामी ३ वर्षांत २ टक्के प्लॅटिनम मिसळलेले असल्यास हा कर शून्य होईल.

टॅग्स :सोनंचांदी