Join us

सेन्सेक्समध्ये सुधारणा

By admin | Published: February 17, 2017 12:45 AM

शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १४६ अंकांनी वाढला. सुरुवातीला सेन्सेक्स २८,२२३ अंकांवर पोहोचला.

मुंबई : शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १४६ अंकांनी वाढला. सुरुवातीला सेन्सेक्स २८,२२३ अंकांवर पोहोचला. त्यानंतर तो २८,१४६.१९ अंकांच्या नीचांकावर गेला. अखेर सेन्सेक्स १४५.७१ अंकांनी किंवा ०.५२ टक्क्यांनी वाढून २८,३०१.२७ अंकांवर बंद झाला. टाटा मोटर्स, सन फार्मा, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक, मारुती सुझुकी, गेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, एनटीपीसी आणि सिप्लाच्या शेअरमध्ये सुधारणा झाल्याने सेन्सेक्स वधारला असल्याचे सांगितले जात आहे, तर निफ्टी ५३.३० अंक म्हणजेच ०.६१ टक्क्याने वाढून ८,७७८ अंकांवर बंद झाला. (वाणिज्य प्रतिनिधी) रुपया घसरला मुंबई : डॉलरची मागणी वाढल्याने गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत १७ पैशांनी घसरला. प्रति डॉलर ६७.०७वर तो स्थिर झाला. दरम्यान, देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाल्याने रुपयाची घसरण सुरुवातीला मर्यादित राहिली. गुरुवारी रुपया ६६.९४वर पोहोचला आणि अखेर ६७.०७वर बंद झाला. (वाणिज्य प्रतिनिधी)