Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३००० रुपयांचे जॅकेट ३०० रुपयांत; तरीही लोक घ्यायला तयार नाही; ग्राहकांनी नेमकं काय झालंय?

३००० रुपयांचे जॅकेट ३०० रुपयांत; तरीही लोक घ्यायला तयार नाही; ग्राहकांनी नेमकं काय झालंय?

China's deflationary economy : भारताला कायम पाण्यात पाहणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या मंदीतून जात आहे. मोठ्या सवलतीनंतरही बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा दुष्काळ दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:41 IST2025-03-11T12:41:18+5:302025-03-11T12:41:39+5:30

China's deflationary economy : भारताला कायम पाण्यात पाहणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या मंदीतून जात आहे. मोठ्या सवलतीनंतरही बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा दुष्काळ दिसत आहे.

In deflation hit China one store holds flash sales four times a day | ३००० रुपयांचे जॅकेट ३०० रुपयांत; तरीही लोक घ्यायला तयार नाही; ग्राहकांनी नेमकं काय झालंय?

३००० रुपयांचे जॅकेट ३०० रुपयांत; तरीही लोक घ्यायला तयार नाही; ग्राहकांनी नेमकं काय झालंय?

China's deflationary economy : भारताकडे कायम डोळे वटारुन पाहणाऱ्या चीनची अवस्था सध्या वाईट झाली आहे. चीनमधील ग्राहक चलनवाढीचा दर (CPI) फेब्रुवारीमध्ये शून्याच्या खाली गेला आहे. अर्थव्यवस्थेत सध्या सुरू असलेली मंदी आणि चलनवाढीचा दबाव चीनच्या आर्थिक आरोग्याचे कंबरडे मोडत आहे. बाजारपेठेत ग्राहकच नसून भरघोस सूट देऊनही मालाची विक्री होत नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी चिनी सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र, त्यानंतरही स्थिती फारशी सुधारल्याचे दिसत नाही.

बीजिंगमध्ये, व्हँक्लाई स्टोअरमध्ये दिवसातून ४ वेळा फ्लॅश सेल लावला जात आहे. तरीही ग्राहक फिरकत नाही. स्टोअर मॅनेजर लिओ लिऊ म्हणतात की ते २८०० रुपयांचे जॅकेट आम्ही फक्त २३० रुपयांना देत आहे. छोटी दुकानेच नाहीत, तर इलेक्ट्रिक कार उत्पादक बीवायडी आणि स्टारबक्ससारख्या मोठ्या कंपन्यांकडेही ग्राहकांचा दुष्काळ पडला आहे.

चीनवर मोठं आर्थिक संकट
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारावर ०.७% नी घसरला, तर जानेवारीमध्ये तो ०.५% वाढला. ग्राहक महागाई शून्याच्या खाली जाणे हे कोणत्याही देशासाठी चांगले लक्षण नाही. चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे ग्राहकांच्या खर्चात घट, कर्जाचा बोजा वाढणे आणि उच्च बेरोजगारी यासारख्या समस्या निर्माण होतात. याच समस्या आता चीनमध्ये निर्माण होत आहेत.

चीनमध्ये ग्राहकांचा दुष्काळ
चीनमध्ये मंदीचा प्रभाव इतका खोलवर पोहोचला आहे, की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांना मोठ्या प्रमाणात सूट द्यावी लागत आहे. बीजिंगच्या फायनान्शिअल डिस्ट्रिक्टजवळ स्थित वांकलाई स्टोअरमध्ये कपडे, स्नॅक्स आणि घरगुती वस्तू विकल्या जातात. परंतु, ग्राहकांच्या घटत्या संख्येचा थेट नफ्यावर परिणाम होत आहे.

मोठ्या कंपन्यांवरही संकट
केवळ लहान दुकानदारच ग्राहकांअभावी झगडत आहेत, असे नाही. चीनी इलेक्ट्रिक कार कंपनी BYD ला देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलत द्यावी लागत आहे. कंपनीने काही कारच्या किमती १०,००० डॉलरपेक्षा कमी केल्या आहेत. बाजारात वस्तू विकण्यासाठी डिस्काउंट वॉरचा फटका कॉफी ब्रँड स्टारबक्सलाही बसला आहे. किमती कमी करून स्थानिक ब्रँड लकिन कॉफीने स्टारबक्सला बाजारात मागे टाकले आहे. चायनीज रेस्टॉरंटचे मेन्यूचे दरही कमी झाले आहेत.

Web Title: In deflation hit China one store holds flash sales four times a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.