नवी दिल्ली : मार्च तिमाहीमध्ये मुंबई, दिल्लीसह देशातील प्रमुख ८ शहरांमध्ये घरांच्या किमती वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या किमती कोरोनापूर्व पातळीवर पोहोचल्या आहेत.
बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईच्या अहवालानुसार, वाढती मागणी आणि बांधकाम खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळे घरांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या घरांच्या किमतीत ११% वाढ झाली असून, त्यात आणखी ५ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये घरांची मागणी वाढली आहे.
कुठे झाली किती वाढ? शहर किंमत वाढमुंबई १९,५५७ ०१%पुणे ७,४८५ ०३%दिल्ली ७,३६३ ११%हैदराबाद ९,२३२ ०९%अहमदाबाद ५,७२१ ०८%कोलकाता ६,२४५ ०६%बंगळुरू ७,५९५ १.३%चेन्नई ७,१०७ १.२%