नवी दिल्ली :
जगभरात मंदी असताना भारतातही त्याचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. दर चार भारतीयांपैकी एकाला (२५ टक्के जणांना) नोकरी गमावण्याची भीती आहे तर चारपैकी तीन (७५ टक्के) जण वाढत्या महागाईबद्दल चिंतेत असल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे.
डेटा आणि विश्लेषण कंपनी कांतारने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशातील निम्म्या लोकांना २०२३ मध्ये देशाची अर्थव्यवस्था वाढेल असा अजूनही विश्वास वाटतो आहे.
अहवालात कांतारला आढळले की, सामान्य करदाते आयकर उत्पन्न मर्यादेत वाढ होण्याची प्रचंड वाट पाहात आहेत. ५० टक्के लोकांना वाटते की, २०२३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वाढेल, तर ३१ टक्के लोकांना वाटते की तिचा वेग
कमी होईल. .
बजेटकडून अपेक्षा काय?
- मूळ आयकर सवलत मर्यादा सध्याच्या २.५ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवावी.
- ३० टक्के सर्वाधिक कर (विद्यमान १० लाख) मर्यादा वाढवण्यात यावी.
- सरकार रोजगार वाढवण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न करेल.
- पायाभूत सुविधांवर भर देण्यात यावा
- तूट नियंत्रित करणे आवश्यक
- अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर आवश्यक
- महागाई तात्काळ कमी करण्यासाठी उपाय गरजेचे
भारतीयांना कशाचा त्रास?
- जागतिक आर्थिक मंदी
- कोरोनाचा पुन्हा असलेला प्रसार
- प्रचंड वाढत असलेली महागाई
०४ पैकी तीन लोकांना वाढत्या महागाईची चिंता आहे. सरकारने महागाई कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे.
०४ पैकी ०३ भारतीयांना नोकरी जाण्याची भीती आहे.
४२% लोकांनी आयकर सवलत मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे.
सर्वेक्षण कुठे?
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, इंदूर, पाटणा, जयपूर, लखनौ