नवी दिल्ली : येत्या काही वर्षांत भारतातील रेल्वे स्थानकांचे चित्र बदलू शकते. 40 हून अधिक स्थानकांचे मॉल्समध्ये रूपांतर केले जाऊ शकते आणि त्यासाठी रेल्वे 17,500 कोटींचे पॅकेज तयार करत आहे. ही स्थानके रूफटॉप प्लाझाने सुसज्ज असतील, ज्यात शॉपिंग सेंटर्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट असतील. रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन रेल्वेचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, रेल्वे ब्लूप्रिंटमध्ये म्हटले आहे की अनेक स्थानके उन्नत रस्त्याने (एलिवेटेड रोड) जोडली जातील आणि काही स्थानकांवर एअर कॉन्कोर्स, फूड कोर्ट आणि इतर सुविधांसह ट्रॅकच्यावर जागा असेल आणि हॉटेल रूम असतील.
उदाहरणार्थ, सोमनाथमधील स्थानकाच्या छतावर १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधित्व करणारे एक डझन शिखर असतील, तर बिहारमधील गया स्थानकात यात्रेकरूंसाठी स्वतंत्र हॉल असेल. काही स्थानकांसाठी म्हणजेच कन्याकुमारीसाठी 61 कोटी रुपये आणि नेल्लोरसाठी 91 कोटी रुपये, तर प्रयागराज आणि चेन्नईसारख्या प्रमुख स्थानकांना अनुक्रमे 960 कोटी आणि 842 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. ही ब्ल्यू प्रिंट केवळ रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी नाही. तर सार्वजनिक-खासगी भागीदारीकडे रेल्वेचा कसा दृष्टिकोन आहे, हे देखील ही योजना सूचित करते.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "आता आम्ही फक्त कोअर स्थानक परिसर विकसित करण्यासाठी पैसे खर्च करत आहोत. येत्या दोन-तीन वर्षांत त्या भागात बांधल्यानंतर, आम्ही या स्थानकांची देखभाल करण्यासाठी आणि आसपासच्या भागात अधिक रिअल इस्टेट विकसित करण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून निविदा मागवू."
दरम्यान, यावेळी रेल्वेने बॉल रोलिंगपूर्वी आवश्यक निधीची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील 46 स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने 17,500 कोटी रुपये (2021-22 च्या पुरवणी बजेटमध्ये 12,000 कोटी रुपये आणि 2022-23 च्या बजेटमध्ये 5,500 कोटी रुपये) मंजूर केले आहेत. रेल्वेने नंतरच्या टप्प्यात देशातील एकूण 9,274 (मार्च 2020 चे आकडे) मधून 300 स्थानकांचा पुनर्विकास करण्याची योजना तयार केली आहे.