Lokmat Money > बिझनेस न्यूज > सहा महिन्यांत ९८ हजार कर्मचारी बसले घरी; आयटीची ‘ऐट’ गेली; कपातीचे सत्र थांबेना

सहा महिन्यांत ९८ हजार कर्मचारी बसले घरी; आयटीची ‘ऐट’ गेली; कपातीचे सत्र थांबेना

आयटी क्षेत्रातील नाेकऱ्यांवरील संकट अजूनही टळलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 07:01 AM2024-06-28T07:01:38+5:302024-06-28T07:02:51+5:30

आयटी क्षेत्रातील नाेकऱ्यांवरील संकट अजूनही टळलेले नाही.

In six months, 98 thousand employees sat at home | सहा महिन्यांत ९८ हजार कर्मचारी बसले घरी; आयटीची ‘ऐट’ गेली; कपातीचे सत्र थांबेना

सहा महिन्यांत ९८ हजार कर्मचारी बसले घरी; आयटीची ‘ऐट’ गेली; कपातीचे सत्र थांबेना

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील नाेकऱ्यांवरील संकट अजूनही टळलेले नाही. यावर्षी केवळ सहा महिन्यांमध्येच भारतातील ३३७ कंपन्यांनी ९८ हजार कर्मचऱ्यांना घरी बसविले आहे. २०२२पासून सुरू झालेले कपातीचे सत्र दाेन वर्षांनंतरही थांबत नसल्याचे चित्र आहे. 

आयटी क्षेत्रातील कर्मचारी कपातीबाबत माहिती पुरविणाऱ्या ‘लेऑफ्स.एफवायआ’ या संस्थेने यावर्षीची माहिती दिली आहे. त्यानुसार, सहा महिन्यात ३३७ टेक कंपन्यांनी एकूण ९८,८३४ कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. इतरही अनेक कंपन्यांनी कर्मचारी कमी केले आहेत.

२,६२,९१५ कर्मचाऱ्यांना २०२३मध्ये टेक कंपन्यांनी घरी बसविले हाेते.
५९% कपातीमध्ये वाढ; २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये झाली.
कशामुळे कपात? :  कंपन्यांचा नफा घटला आहे. त्यामुळे कंपन्या खर्च कमी करत आहेत.

Web Title: In six months, 98 thousand employees sat at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.