लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : साधारणत: लोक उतारवयात मृत्युपत्र लिहित असतात. मात्र हल्ली वयाच्या चाळिशीमध्येच मृत्युपत्र लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. हा कल सर्वांनाच चकित करणारा असून असे का होत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबईतील व्हर्च्युअल विल रायटिंग अँड ॲडव्हायजरी संस्था ‘विलजिनी’ला मागील ६ महिन्यांत सुमारे ७ हजार चौकशी करणारे कॉल मिळाले आहेत. त्यातील १० पैकी ४ लोक ३० ते ५० वयोगटातील आहेत. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद आणि पुणे येथून सर्वाधिक चौकशा प्राप्त झाल्या आहेत.
अकाली मृत्यू वाढले
nकोरोनात मोठ्या संख्येने लोक मरण पावले. त्यानंतर हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
nत्यामुळे लोक भविष्याबाबत चिंतित आहे. कुटुंबीयांसमाेर अडचणी येऊ नयेत, यासाठी लवकर मृत्युपत्र तयार करण्याकडे कल वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रक्रिया झाली सोपी
स्टार्टअप कंपन्यांनी मृत्युपत्र लिहिण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. आता घरबसल्या मृत्युपत्र लिहिता येते. त्यामुळेही मृत्युपत्र लिहिण्याचा कल वाढला आहे.
हे कारणही महत्त्वाचे
३५ ते ४० या वयात परिवार पूर्ण होतो. या काळापर्यंत मुले झालेली असतात, पहिले घर झालेले असते, पहिली गाडी आलेली असते, पुरेशी बचतही असते. त्यामुळे लोक मृत्युपत्र लिहून टाकतात.