Join us  

‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचारी संकटात, दाेन वर्षांत गेल्या अडीच लाख नाेकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 8:49 AM

महामंदीच्या काळापेक्षाही परिस्थिती झाली गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमेरिकेत यावर्षी फार माेठ्या प्रमाणात नाेकर  कपात सुरू आहे. लेहमन ब्रदर्सचे पतन झाल्यानंतर २००८-०९ या काळात आलेल्या महामंदीत जेवढी कर्मचारी कपात झाली होती, त्यापेक्षा अधिक कर्मचारी कपात यंदा झाल्याचे दिसून आले आहे. २०२३मध्ये परिस्थिती आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. 

जागतिक प्लेसमेंट संस्था ‘चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ हे वर्ष सर्वाधिक वाईट असण्याची शक्यता आहे. ‘मार्केटवॉच’च्या अहवालानुसार, २०२३ आणि त्यापुढे टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. पश्चिमेकडील देशांना मंदीची चिंता सतावत आहे. ॲमेझाॅन आणि एचपी आयएनसी यांनी नजीकच्या भविष्यात अनुक्रमे २० हजार व ६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी चालविली आहे. मेटाने जगभरातील ४ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुगलनेही मोठ्या कर्मचारी कपातीची तयारी चालविली आहे. 

अमेरिकेत ७३ हजार, भारतात १७ हजार कर्मचाऱ्यांना फटका nनोव्हेंबरच्या मध्यात अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी ७३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. nसामूहिक कर्मचारी कपातीच्या स्वरूपात ही कारवाई करण्यात आली. nकर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांत मेटा, ट्विटर, सेल्सफोर्स, नेटफ्लिक्स, सिस्को, रोकू आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे. nभारतात १७ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी कामावरून काढले आहे.

पश्चिमेकडील मंदीत भारताला संधी - अर्थमंत्रीnपश्चिमेकडील देशांवर मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत बहुराष्ट्रीय कंपन्या भारताकडे आकर्षित झाल्या आहेत. अशावेळी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना भारतात आणाण्यासाठी देशातील उद्याेग विश्वाने रणनीती आखायला हवी, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. nएका कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, या कंपन्या त्यांचे कामकाज सुरू राहील, असे ठिकाण शाेधत आहेत. सरकारदेखील यादृष्टीने काम करत आहे.

१.५ लाख कर्मचारी घरी बसलेप्रमुख ९६५ तंत्रज्ञान कंपन्यांनी १,५०,००० कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. हा आकडा २००८-०९ या काळातील महामंदीच्या पातळीपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांत मेटा, ॲमेझॉन, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स यासारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञाननोकरी