Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीमंत भारतीयांच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी सर्वांवर भारी!

श्रीमंत भारतीयांच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी सर्वांवर भारी!

अंबानी यांची संपत्ती ८.०८ लाख कोटी रुपये आहे. हुरुनने जारी केलेली ही १२वी वार्षिक यादी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:33 PM2023-10-11T12:33:26+5:302023-10-11T12:36:01+5:30

अंबानी यांची संपत्ती ८.०८ लाख कोटी रुपये आहे. हुरुनने जारी केलेली ही १२वी वार्षिक यादी आहे.

In the list of rich Indians, businessman Mukesh Ambani is heavy on all | श्रीमंत भारतीयांच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी सर्वांवर भारी!

श्रीमंत भारतीयांच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी सर्वांवर भारी!

नवी दिल्ली :  ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या २०२३च्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांना मागे टाकून सर्वोच्च स्थानी आले आहेत. अंबानी यांची संपत्ती ८.०८ लाख कोटी रुपये आहे. हुरुनने जारी केलेली ही १२वी वार्षिक यादी आहे.
‘३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३’ या नावाच्या अहवालात ‘हुरुन’ने भारतातील श्रीमंतांची यादी मंगळवारी जारी केली. गौतम अदानी हे ४.७४ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानी ढकलले गेले आहेत. 

सायरस पुनावाला तिसऱ्या स्थानी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला २.७८ लाख कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानी कायम आहेत. २.२८ लाख कोटींच्या संपत्तीसह एचसीएलचे शिव नाडर हे चौथ्या आणि १.७६ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह गोपीचंद हिंदुजा पाचव्या स्थानी आहेत. 

अब्जाधीशांच्या यादीत ३८ जणांची भर 
जारी केलेल्या यादीत २५९ अब्जाधीशांचा समावेश आहे. ही संख्या मागील वर्षीपेक्षा ३८ ने वाढलेली आहे. झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा (वय २०) हे सर्वात कमी वयाचे अब्जाधीश आहेत. ही यादी जाहीर करण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच सर्व श्रीमंताची संपत्ती वाढून १०९ लाख कोटींवर पोहोचली आहे.

श्रीमंताच्या एकूण संपत्तीत ८.५ टक्के वाढ
श्रीमंतांची एकूण संपत्ती ८.५ टक्क्यांनी वाढली आहे तर त्यांच्या सरासरी संपत्तीत ९.३ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास १,०५४ जणांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात २७८ चेहरे नवीन आहेत. २६४ जणांच्या संपत्ती घट झाली आहे. ५५ जण यादीतून बाहेर पडले आहेत. 

Web Title: In the list of rich Indians, businessman Mukesh Ambani is heavy on all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.