Lokmat Money > बिझनेस न्यूज > एप्रिल महिन्यात GST नं सरकारची विक्रमी तिजोरी भरली, एका दिवसात जमा झाले ६८,२२८ कोटी

एप्रिल महिन्यात GST नं सरकारची विक्रमी तिजोरी भरली, एका दिवसात जमा झाले ६८,२२८ कोटी

एप्रिल महिन्यात जीएसटी कलेक्शनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 11:48 PM2023-05-01T23:48:44+5:302023-05-01T23:49:20+5:30

एप्रिल महिन्यात जीएसटी कलेक्शनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला.

In the month of April GST record collection 68228 crore in a single day highest 1 87 lakh crore | एप्रिल महिन्यात GST नं सरकारची विक्रमी तिजोरी भरली, एका दिवसात जमा झाले ६८,२२८ कोटी

एप्रिल महिन्यात GST नं सरकारची विक्रमी तिजोरी भरली, एका दिवसात जमा झाले ६८,२२८ कोटी

एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाचे (GST Collection) आकडे समोर आले आहेत. गेल्या महिन्यात सरकारचेजीएसटी संकलन १.८७ लाख कोटी रुपये होते, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान, एकाच दिवसात सर्वाधिक संकलनाचा विक्रमही झाला. २० एप्रिल रोजी ९.८ लाख व्यवहारांमधून ६८,२२८ कोटी रुपयांचा कर जमा झाला. एका दिवसात सर्वाधिक कर संकलनाचा हा विक्रम आहे. 

यापूर्वी हा विक्रम गेल्या वर्षी २० एप्रिल रोजी झाला होता. तेव्हा एका दिवसात ९.६ लाख व्यवहारांद्वारे ५७,८४६ कोटी रुपये जमा झाले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १,६७,५४० कोटी रुपये होते. मात्र यावेळी हा विक्रम मोडला. एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन यापेक्षा १९,४९५ कोटी रुपये अधिक होते. मार्चमध्ये जीएसटी संकलन १.६ लाख कोटी रुपये होते.

एप्रिलमध्ये सीजीएसटी ३८,४४० कोटी रुपये, एसजीएसटी ४७,४१२ कोटी रुपये, आयजीएसटी ८९,१५८ कोटी रुपये (गुड्स इम्पोर्टवर जमा ३४,९७२ कोटी रुपये) आणि सेस १२,०२५ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा केलेले ९०१ कोटी रुपये) होते. एका महिन्यात जीएसटी संकलन १.७५ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सलग दुसऱ्यांदा वाढ
यामध्ये सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ते १.४९ लाख कोटी रुपये आणि मार्चमध्ये १.६० लाख कोटी रुपये होते. केंद्राला २०२४ या आर्थिक वर्षात जीएसटीच्या रुपात म्हणून ९.५६ लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे, जे गेल्या वर्षीच्या संकलनापेक्षा १२ टक्क्यांनी जास्त आहे.

Web Title: In the month of April GST record collection 68228 crore in a single day highest 1 87 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.