चुकून लागणाऱ्या ऑर्डर टाळण्यासाठी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये 'स्टॉप लॉस विथ मार्केट कंडिशन'वर (SLM) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसई ९ ऑक्टोबरपासून बाजारातील परिस्थितीनुसार स्टॉप लॉस ऑर्डर बंद करेल. तोटा कमी करण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी स्टॉप लॉस हा एक उत्तम मार्ग आहे, परंतु त्याला दोन पर्याय आहेत. पहिला स्टॉप लॉस लिमिट प्राईजवर ट्रिगर होतो. तर दुसरा स्टॉप लॉस विथ मार्केट कंडिशन म्हणजेच एसएलएमवर स्टॉप लॉस बाजार भावावर ट्रिगर होतो.बीएसईनं एसएलएमवर म्हणजेच स्टॉप लॉस विथ मार्केट कंडिशनवर बंदी घातली आहे. अशा पर्यायांमध्ये लिक्विडिटी कमी होती, एसएलएममुळे खूप जास्त किमतीत सौदे केले जात असल्याचे दिसून आलं होतं. ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सिस्टम सर्व दिलेल्या बीड्सना स्वीकारण्याची परवानगी देत असल्यानं, जर एखाद्यानं खूप मोठी बीड दिली असेल तर एसएलएममुळे ती देखील स्वीकारली जाते आणि किंमतीत अचानक मोठी उसळी दिसून येते. एसएलएममुळे बाजारात खूप जास्त किमतीत सौदे केले जात असल्याचं बीएसईच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यांच्या मते, अलीकडे झालेले फ्रिक ट्रेट कोणत्या सिस्टम किंवा ट्रेडरच्या चुकीमुळे झाले नव्हते. हे केवळ एसएलएममुळे दिसून आले होते.
देशांतर्गत बाजारात घसरणसेन्सेक्समध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये विप्रोला सर्वाधिक २.३२ टक्के तोटा झाला. काही आशियाई बाजारांमध्ये सुधारणा असूनही देशांतर्गत बाजारातील घसरण कायम आहे. गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकींगमुळे शेअर बाजारही घसरणीसह बंद झाले, अशी प्रतिक्रिया कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे अमोल आठवले यांनी दिली. 'भारतीय बाजाराचे मूल्यांकन आता अधिक झालं आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरचा निर्देशांक मजबूत होणं आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) सातत्यानं होणारी विक्री या घटकांचीही यात मोठी भूमिका आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.59 टक्क्यांनी वाढून 93.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.