Join us

Shark Tank India च्या तिसऱ्या सीझनमध्ये नव्या शार्कची एन्ट्री, तुमच्याही आहेत परिचयाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 12:57 PM

तुम्ही देखील शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनची तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.

तुम्ही देखील शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनची (Shark Tank India Season 3)  तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. यावेळी सर्व जजेससोबत एका नव्या जजची म्हणजेच नव्या शार्कची एन्ट्री होणार आहे. आयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यावेळी शार्क म्हणून शार्क टँक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये दिसतील. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून दिली आहे.त्यांच्याशिवाय, शार्क टँक इंडियाच्या हँडलवरून रितेश अग्रवालच्या एन्ट्रीबद्दल आणि सर्व शार्क्सबद्दल अपडेट देण्यात आलं आहे. यासंदर्भात एक छोटा प्रमोशनल व्हिडीओही शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये शार्क टँक इंडियाच्या सेटवर रितेश अग्रवाल शार्कच्या खुर्चीवर बसल्याचे दाखवण्यात आलेय.काय म्हणाले रितेश अग्रवाल?"जेव्हा मी उद्योजक म्हणून सुरुवात केली, तेव्हा साधनांची कमतरता होती. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये प्रत्येकाच्या मदत करण्याच्या स्वभामुळे मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली," असं रितेश अग्रवाल म्हणाले. ज्याप्रकारे त्यांना इतरांनी मदत केली, त्याप्रमाणे आपल्यालाही इतरांची मदत करायची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपण अनेक स्टार्टअप्सना मदत केली आहे. Naropa Fellowship द्वारे आपण अनेक उद्योजकांना मदत केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय.२९ व्या वर्षी सुरू केली कंपनी२०१३ मध्ये रितेश अग्रवाल यांनी वयाच्या २९ व्या वर्षी OYO Rooms नावाची कंपनी सुरू केली होती. Thiel Fellowship मध्ये १ लाख डॉलर्स मिळवल्यानंतर त्यांनी या पैशातूच आपलं स्टार्टअप सुरू केलं.

टॅग्स :व्यवसायटेलिव्हिजन