Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mega Projects: काेणत्या देशात सध्या सुरू आहेत महाप्रकल्प? ९ प्रकल्प १०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त किंमतीचे

Mega Projects: काेणत्या देशात सध्या सुरू आहेत महाप्रकल्प? ९ प्रकल्प १०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त किंमतीचे

Mega Projects: वाढत्या लाेकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगभरात माेठमाेठ्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी १० अब्ज डाॅलर किंवा त्यापेक्षा जास्त खर्च असलेल्या प्रकल्पांना मेगा प्रकल्प म्हटले जात हाेते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 07:03 AM2023-06-28T07:03:20+5:302023-06-28T07:03:20+5:30

Mega Projects: वाढत्या लाेकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगभरात माेठमाेठ्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी १० अब्ज डाॅलर किंवा त्यापेक्षा जास्त खर्च असलेल्या प्रकल्पांना मेगा प्रकल्प म्हटले जात हाेते.

In which country are the mega projects currently underway? | Mega Projects: काेणत्या देशात सध्या सुरू आहेत महाप्रकल्प? ९ प्रकल्प १०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त किंमतीचे

Mega Projects: काेणत्या देशात सध्या सुरू आहेत महाप्रकल्प? ९ प्रकल्प १०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त किंमतीचे

नवी दिल्ली  -  वाढत्या लाेकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगभरात माेठमाेठ्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी १० अब्ज डाॅलर किंवा त्यापेक्षा जास्त खर्च असलेल्या प्रकल्पांना मेगा प्रकल्प म्हटले जात हाेते. आता परिस्थिती बदलली आहे. मेगा प्रकल्पांची परिभाषाही बदलली आहे. जगभरात १०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त रकमेच्या अनेक मेगा प्रकल्पांवर काम सुरू आहे. चालू दशकाच्या अखेरीस कदाचित एक हजार अब्ज डाॅलरच्या मेगा प्रकल्पांचे युग सुरू हाेईल, असा अंदाज वन बिल्ड या बांधकाम क्षेत्रातील साॅफ्टवेअर कंपनीने वर्तविला आहे.

जगभर प्रमुख मेगा प्रकल्प
    नाव     कुठे     किंमत
    टेन-टी काेर     परिवहन युराेप     ६००
    नियाेम सिटी     साैदी अरब     ५००
    गल्फ रेल्वे     आखाती देश     २५०
    आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन     पृथ्वीची कक्षा     २३०
    सिल्क सिटी     कुवैत     १३२
    किंग अब्दुल्ला आर्थिक सिटी     साैदी अरब     १००
    दिल्ली-मुंबई औद्याेगिक काॅरिडाॅर     भारत    १००
    कॅलिफाेर्निया हाय स्पीड रेल्वे    अमेरिका    १००
    फाॅरेस्ट सिटी     मलेशिया    १००
    दुबई लॅंड     यूएई    ६४

अडचणी काय?
माेठ्या प्रकल्पांचे काम जटिल असते. भूसंपादनाशिवाय अनेक कायदेशीर अडचणी येतात. त्यामुळे ते पूर्ण हाेण्यास बरीच वर्षे लागतात. मंदी आणि काेराेनासारख्या संकटांमुळे प्रकल्पांना विलंब झाला आहे.
९८% 
प्रकल्पांच्या किमती 
३० टक्क्यांनी वाढतात.
७७% 
प्रकल्प ४० टक्के 
विलंबाने पूर्ण हाेतात.

खर्च का वाढतो?
विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या एकूण किमतीवर परिणाम हाेताे. तंत्रज्ञानात बदल, कच्च्या मालाच्या किमती, माेलमजुरीत वाढ, कामगारांचा तुटवडा आदी कारणांमुळे मेगा प्रकल्पांचा खर्च वाढला.
आखाती देशात वेग
सध्या सुरू असलेल्या मेगा प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांचा खर्च १०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त आहे. त्यापैकी ५० टक्के प्रकल्प आखाती देशात आहेत. दोन प्रकल्पांचे मूल्य ५०० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त आहे.
भारतातील एकच प्रकल्प या यादीत आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत ३० अब्ज डाॅलर एवढी आहे.

Web Title: In which country are the mega projects currently underway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.